शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावजवळ गोकुळच्या अधिकाऱ्यांना डांबले, दूध दरात कपात केल्यामुळे दूध उत्पादक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:10 IST

बेळगाव : गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्वसूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक ...

बेळगाव : गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्वसूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूरप्रमाणे दर वाढवून मिळावा अशी मागणी करत गोकुळच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून बाहेरून टाळे ठोकले. ही घटना अलतगा (ता. जि. बेळगाव) येथे शुक्रवारी दुपारी घडली.सीमाभागातील बेळगाव व खानापूर तालुक्यातून दररोज एकूण सुमारे ४० हजार लिटर दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध केंद्राच्या ठिकाणी जाते. या पद्धतीने सीमाभागातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या गोकुळ दूध संघाने १ फेब्रुवारी २०२४ पासून गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर ४.५० रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या दूध उत्पादकांनी शुक्रवारी सकाळी अलतगा येथील श्री ब्रह्मलिंग दूध उत्पादक संघाच्या शाखेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून शाखेला घेराव घातला. गोकुळचे विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे यांना जाब विचारला. त्यावेळी हरकारे यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.तथापि, दूध उत्पादकांनी जोपर्यंत दूध दरवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे ठासून सांगितले. तसेच एवढ्यावर न थांबता आक्रमक झालेल्या दूध उत्पादकांनी विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे, गोकुळ दूध संकलक शरद पवार, परशराम पारधी व कुलदीप पवार यांना संघाच्या कार्यालयात डांबून कार्यालयाला टाळे ठोकले.आंदोलक दूध उत्पादक बाळू पाटील म्हणाले की, काही लोकांनी कोल्हापूरला जाऊन प्रयत्न केल्यानंतर ५ रुपये हा दर वाढवून ६ रुपये करण्यात आला. सध्या दुधाचा दर इतका कमी करण्यात आला आहे की बेरीज, वजाबाकी केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच पैसे उरत नाहीत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळbelgaonबेळगाव