शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election -सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:22 IST

Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.

ठळक मुद्देसत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातूनजिव्हारी लागेल असा अपमान, बदला म्हणून आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.तसे आबाजी हे महाडिक यांचे अत्यंत विश्वासू संचालक, किंबहुना त्यांची सावलीच. कधीच त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात दोन्ही निवडणुकीत ते महाडिक गटाच्या प्रचारात आघाडीवर होते. त्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. गावातील एका प्रकरणात आबाजींना पोलिसांकडून बराच त्रास झाला. तरीही ते महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु संघाच्या मुंबईतील जागेच्या व्यवहारात महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात विसंवाद घडला. त्यातून महाडिक यांनी आबाजींना राजीनामा देण्याचे आदेश दिले. तेवढेच करून ते थांबले नाहीत.

संघाच्या राजकारणातील अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ संचालकास त्यांनी त्यांच्या स्वाभिमानास ठेच पोहोचेल अशी वागणूक दिली. त्यानंतर आबाजींनी लगेच राजीनामा दिला. परंतु ते महाडिक यांच्यापासून दूर गेले. ते संघात महाडिक यांनी बोलविलेल्या बैठकीस जात नसत. पुढे लोकसभा निवडणुकीतही ते धनंजय महाडिक यांच्या प्रचारापासून लांब राहिले. त्यातच गत विधानसभेला महाडिक यांनी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्याबद्दलही टिपणी केली. त्यातून तेही दुखावले.

या दोघांची गट्टी जमली. संघाच्या राजकारणात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या निधनानंतर चुयेकर घराणे आबाजींच्या चांगले संपर्कात होते. त्यामुळे आबाजी असतील तिकडे चुयेकर घराणे राहणार, हे स्पष्टच होते. त्यामुळेच आबाजी-डोंगळे-चुयेकर ही त्रिमूर्ती एकत्र आली व तिथूनच सत्ताधारी आघाडीची पडझड सुरू झाली.डोंगळे-आबाजी यांनी नेत्यांकडून सगळे फायदे घेऊन बाहेर पडले असल्याने त्यांच्यामागे कोण जातंय, असा एक होरा होता. परंतु तो खोटा ठरला. या तिघांनी आपल्याकडील ठरावधारक एकही हलू दिला नाहीच, शिवाय सत्तारूढ आघाडीतील मतेही कशी मिळतील अशी फिल्डिंग लावल्याने विरोधी आघाडीचा विजय सोपा बनल्याचे चित्र निकालानंतर दिसत आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर