शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:20 IST

..म्हणून जागा वाढवण्याचा निर्णय घेतला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ होणार आहे. उद्या, मंगळवारच्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे. ‘गोकुळ’साठी इच्छुकांची संख्या पाहून जास्तीत जास्त इच्छुकांना संधी देण्याचा यातून प्रयत्न आहे.‘गोकुळ’च्या सत्तेत जाण्यासाठी सगळेच आसुलेले आहेत. मागील निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांची ३० वर्षांची सत्ता घालविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकवटले होते. त्यातून सत्तांतर करण्यात यश आले, पण चार वर्षांनंतर सत्तारूढ गटातच मतभेद वाढले. त्याचे पडसाद अध्यक्ष निवडीवर पडले. आमदार सतेज पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर यांना बाजूला करून नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर, ‘गोकुळ’च्या राजकारणाने गती घेतली आहे.ठराव गोळा करण्यास अजून कालावधी असताना ज्या पद्धतीने साम, दाम, दंड नीतीचा वापर सुरू आहे. ते पाहता, आगामी निवडणुकीत काटा लढत होणार हे लक्षात येते. उमेदवारीवरूनही सत्तारूढ व विरोधी गटात रस्सीखेच राहणार आहे. महायुती एकसंध राहिली तर उमेदवारी देताना त्यांची दमछाक होणार आहे. त्यामुळेच संचालक मंडळाची जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसाधारण जागा १६ वरून २० होणार‘गोकुळ’चे संचालक मंडळात २१ पैकी १६ जागा सर्वसाधारण गटातील तर पाच राखीव गटातील आहेत. वाढीव चारही जागा सर्वसाधारण गटात वाढणार आहेत.‘केडीसीसी’च्या चार जागा वाढल्याकेडीसीसी बँकेने दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २५ केली. यामध्ये दूध संस्था गटात एक, प्रक्रिया संस्था गटात १ तर इतर संस्था गटात २ जागा वाढवल्या आहेत. प्रक्रिया गटावर बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.