शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:04 IST

चार वर्षांत ९ रुपयांची वाढ

कोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांकडून आलेल्या वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ३ तर गाय दुधाला २ रुपये दिले जात होते. आमच्या काळात यामध्ये अनुक्रमे ६ व ४ रुपये अशी वाढ केली होती. वासाच्या दुधाचे प्रमाण एकूण संकलनाच्या तुलनेत खूप कमी असले तरी यामध्ये दूध संस्थांचे नुकसान होते. यासाठी या दूध दरात वाढ केली असून म्हैस दुधाला १२ तर गाय दुधास ८ रुपये दर देणार असल्याची घोषणा ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सभेत केली.अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, एनडीडीबी, सिस्टीम बायो व ‘गोकुळ’च्या वतीने राबवण्यात आलेल्या बायोगॅस योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून दूध उत्पादकांना ५.९७ कोटींचे अनुदान मिळाले आहे. दूध उत्पादकांची मागणी पाहता ‘मागेल त्याला बायोगॅस’ देण्याचा मानस आहे.

वाचा : मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

स्वत:चा नवीन दही प्रकल्प १ ऑक्टोबरपासून सुरू करत असून बटरचे उत्पादन वाढविले जाणार आहे. भविष्यातील ओला चारा व वाळलेला चारामिश्रीत ‘आयडीयल टीएमआर’ उत्पादन घेणार आहे. गडहिंग्जल चिलिंग सेंटरप्रमाणे ‘बिद्री’ चिलिंग सेंटर एक्स रे सुविधा पशुपालकांना देणार आहे.

आबाजींच्या शेजारी महाडिक यांची खुर्चीशौमिका महाडिक यांना व्यासपीठावर सन्मानाने येण्याचे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्यांच्यासाठी अध्यक्षांच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या शेजारी खुर्ची ठेवली होती. त्या व्यासपीठावर न आल्याने त्यांच्या ठिकाणी अंजना रेडेकर बसल्या. त्या मात्र पहिल्यांदाच सभासदांमध्ये खुर्चीवर बसल्या होत्या.

वाचा : मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडामुराबरोबर आता ‘पंढरपुरी’ही म्हशी मिळणारएनडीडीबीच्या कोल्हापुरातील गोठ्यावर मुरा जातीच्या म्हशीबरोबरच पंढरपुरी म्हशीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी संयमाने सभा चालवली. विरोधकांचे सर्व प्रश्न समजावून घेऊन त्यांनी उत्तरे दिली. वास्तविक संचालकांनी सभेत प्रश्न उपस्थित करायचे नसतात. सभासदांनी प्रश्न विचारणे अभिप्रेत असते, त्यांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. - आमदार सतेज पाटील