शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळच्या 'बोरवडे' शीतकरण केंद्राची मोडतोड; तीन अधिकारी जखमी 

By विश्वास पाटील | Updated: October 14, 2023 15:41 IST

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी संघाच्या बोरवडे ( ...

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी संघाच्या बोरवडे ( ता. कागल ) येथील शीतकरण केंद्राची मोडतोड केली. यावेळी आंदोलकांनी खिडकीच्या काचा फोडल्या तर शाखाप्रमुखांच्या टेबलाची तोडफोड केली. शिवाय झेंड्याच्या काठीने मारहाण केल्याने गोकूळचे तीन कर्मचारी जखमी झाले. याबाबत शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात गाय दूध दरात दोन रुपयांची  कपात केली आहे. ही दरकपात रद्द करुन गाय दूधदर पूर्ववत करावा या मागणीसाठी मनसेचे १० ते १५ कार्यकर्त  सकाळी ९.३० च्या दरम्यान संघाच्या बोरवडे शीतकरण केंद्रावर आले होते. यावेळी संकलन सुरु असल्याने शाखाप्रमुख विजय कदम यांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावले. दरम्यान चर्चा सुरु असतानाच अचानकपणे कार्यकर्त्यांनी खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. शाखाप्रमुखांच्या टेबलाचीही काच फोडून त्याची मोडतोड केली. या फुटलेल्या काचा उडून उपस्थित कर्मचार्‍यांना लागल्याने ते जखमी झाले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कर्मचार्‍यांनाही झेंड्याच्या काठीने मारहाण करत जखमी केले. मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबतची तक्रार शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले, संचालक आर. के. मोरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून माहिती घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळMNSमनसेCrime Newsगुन्हेगारी