शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विडीच्या थोटकाने गोडाऊनला आग; कामगाराचा निष्काळजीपणामुळे कंपनीचे ७० लाखांचे नुकसान

By उद्धव गोडसे | Updated: March 27, 2024 15:59 IST

करवीर पोलिस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे जोतिबा रोडवरील मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीत काम करणा-या कामगाराने पेटत्या विडीचे थोटूक टाकल्याने गोडाऊनला आग लागली. सोमवारी (दि. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या प्रकारात गोडाऊनमधील साहित्य जळून सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत संशयित कर्मचारी ओमप्रकाश विश्वकर्मा (वय २५, सध्या रा. केर्ली, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीचे गोडाऊन केर्ली येथील जोतिबा रोडलगत आहे. या गोडाऊनमध्ये रस्ते बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि यंत्रसामग्री ठेवली होती. ओमप्रकाश विश्वकर्मा हा कामावर असताना विडी ओढून पेटते थोटून त्याने गोडाऊनमध्येच टाकले. थोटकामुळे वाळलेल्या गवताला लागलेली आग सर्वत्र पसरली. या आगीत गोडाऊनमधील एक ट्रक आणि इतर साहित्य जळून खाक झाले.याबाबत कंपनीचे अधिकारी धर्माराव सन्यासी लोट्टी (वय ३०, सध्या रा. केर्ली, मूळ रा. आंध्रप्रदेश) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित ओमप्रकाश विश्वकर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतल्याची माहिती करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस