महाराष्ट्रातील रुग्णांवर गोव्यातही उपचार : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:30 PM2019-10-11T12:30:08+5:302019-10-11T12:35:35+5:30

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अनेक योजना कार्यान्वित ...

Goa treatment for patients in Maharashtra: Pramod Sawant | महाराष्ट्रातील रुग्णांवर गोव्यातही उपचार : प्रमोद सावंत

महाराष्ट्रातील रुग्णांवर गोव्यातही उपचार : प्रमोद सावंत

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील रुग्णांवर गोव्यातही उपचार : प्रमोद सावंतपुन्हा युती सत्तेवर येण्याचा विश्वास

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोकण विभागातील सर्व रुग्णांना गोव्यातील उत्तम रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी डॉ. सावंत गुरुवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महायुतीने विविध विकासयोजना राबविल्या. मी येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना सीपीआर हॉस्पिटलमध्ये जात होतो. तेव्हा कॉँग्रेसच्या काळातील ‘सीपीआर’ची दयनीय अवस्था पाहिली आहे. मात्र चंद्रकांत पाटील आणि अमल महाडिक यांनी या सर्वसामान्यांच्या हॉस्पिटलसाठी मोठा निधी आणून तेथील परिस्थिती बदलली आहे.

आयुष्यमान भारत, फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी अशा विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अंत्योदय म्हणजे सामान्य जनतेसाठीचे राजकारण सुरू आहे.

या सरकारने टोलमुक्त कोल्हापूर केले असे सांगून रोज जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी गोळीबार करीत होते. तो विभाग आता शांत झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी यावेळी केला. गोव्यातील पेट्रोलचे दर तुलनेत कमीच असून रोड टॅक्सही ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

आपल्या पद्धतीने शस्त्रपूजन करणे गैर नाही

संरक्षणमंत्री दिग्विजयसिंह यांनी विदेशामध्ये भारतीय पद्धतीने राफेल विमानांचे पूजन केल्याने भारताची बदनामी झाली का? अशी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये शस्त्रपूजन केले जाते. हे विमान आमचे शस्त्रच आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीनुसार पूजन करणे गैर नाही.
 

Web Title: Goa treatment for patients in Maharashtra: Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.