शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

Kolhapur: पोलिस दिसताच कारने सुसाट सुटले, कंपाउंडमुळे अडकले; गोवा बनावटीच्या दारूसह दोघे जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:58 IST

गगनबावडा : येथे कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर गोवा बनावटीची विनापरवाना दारू पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये विजय ...

गगनबावडा : येथे कोल्हापूर - गगनबावडा महामार्गावर गोवा बनावटीची विनापरवाना दारू पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये विजय उर्फ दिग्विजय दिलीप पांढरपट्टे (वय ३१, रा. गणेशनगर, इचलकरंजी) व अजित विश्वनाथ भंडारे (३७, रा. जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले) यांना चार लाख १८ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी कारही (एमएच १२, एमबी ९७८६) जप्त केली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजय व अजित हे करूळ घाटमार्गे कारने गगनबावडा चौकात आले असता पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. यावेळी कार कोल्हापूरकडे सुसाट गेल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी कार वसतिगृहाच्या पाठीमागे नेली. मागे कंपाउंड असल्याने कार तिथेच सोडून संशयितांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. परंतु पोलिसांनी पाठलाग करत त्यांना गगनबावडा विश्रामगृहाजवळ पकडून ताब्यात घेतले.या कारवाईमध्ये सहायक फौजदार रंगराव सौंदडे, पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कांबळे, सूरज देसाई, शरद इंजुळकर, विक्रम परीट, हवालदार सतीश पाटील, विनोद ढवळे, शशिकांत कोळेकर यांनी सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस