ब्राम्हण सभा करवीरमध्ये शाहू कार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST2021-06-28T04:16:57+5:302021-06-28T04:16:57+5:30
कोल्हापूर : येथील अमृत महोत्सवी ब्राम्हण सभा करवीर या संस्थेत झालेल्या जयंती समारंभात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा ...

ब्राम्हण सभा करवीरमध्ये शाहू कार्याचा गौरव
कोल्हापूर : येथील अमृत महोत्सवी ब्राम्हण सभा करवीर या संस्थेत झालेल्या जयंती समारंभात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कोल्हापुरातील विद्यापीठ, शाळा राजर्षी शाहू महाराजांच्या आशिर्वादाने सुरु झाली, असे गौरवोद्गार संस्थेचे नंदकुमार मराठा यांनी यावेळी काढले.
ब्राम्हण सभा करवीर मंगलधामतर्फे शनिवारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनाेद डिग्रजकर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. करवीर नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, काेषाध्यक्ष उदय सांगवडेकर, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शामराव जोशी या सर्वांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच शाहूंना वंदन करण्यात आले.
जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, औद्योगिक प्रगती, शेती विकास आदी विषयांवर शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती विनोद डिग्रजकर यांनी यावेळी दिली. नंदकुमार मराठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, सहकार्यवाह अशोक कुलकर्णी, संचालक ॲड. विवेक शुक्ल, वृषाली कुलकर्णी, अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर, भुयेकर उपस्थित होते. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी आभार मानले.