शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मिरवणुकीसह गुलाल, डॉल्बीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज, मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज, मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.त्याची मतमोजणी ज्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर कार्यकर्ते जल्लोषात गुलाल उधळण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधी गटाबरोबर वाद होण्याची शक्यता असल्याने विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच निकालानंतर गाड्यांचे सायलेन्सर काढून दंगामस्ती करणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील गावागावांत पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत, तर ४७ संवेदनशील गावांमध्ये राज्य राखीव दलाचे जवान तळ ठोकून आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक असे तीन हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून असल्याचे मोहिते यांनी सांगितले.वाहतूक मार्गात बदलकरवीर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींची मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा शासकीय धान्य गोदाम येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मुख्य टपाल कार्यालय ते मतमोजणी ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महावीर कॉलेज ते कसबा बावड्याकडे जाणारी सर्व वाहने जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह मार्गे ये-जा करतील. कसबा बावड्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने ही भगवा चौक, धैर्यप्रसाद हॉल मार्गे ये-जा करतील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनीदिली.जिल्ह्यात २८६ टेबलांवर मतमोजणीजिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी सकाळी दहापासून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरूहोणार आहे. २८६ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून, यासाठी १७२८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ८५८ कर्मचारी व ८७० निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे. प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी असे नियोजन करण्यात आले आहे.तालुका ग्रामपंचायती स्त्री पुरुष एकूण टक्केवारीकरवीर ५० ६५४६३ ७२४३३ १३७८९६ ७७.९०गगनबावडा १७ ५७९२ ६३४९ १२१४१ ९१.८९हातकणंगले ४० ९५४६३ ८४१८४ १७९६४७ ८२.५७शिरोळ १४ १९९४४ २१८५४ ४१७९८ ८६.७८कागल २६ २२९१५ २४४२२ ४७३३७ ९१.१७राधानगरी ५७ ४२९०८ ४८९६० ९१८६९ ९१.०९आजरा ३१ १८८६३ १८१८८ ३७०५१ ८५.०७भुदरगड ३७ २३४५२ २४६९७ ४८१४९ ८९.२९पन्हाळा ४६ ३२९२९ ३६०६६ ६८९९५ ९१.७८शाहूवाडी ४५ २९३९० ३११८२ ६०५७२ ८७.०७चंदगड ३८ २०१२९ २०४२९ ४०५५८ ८४.१४गडहिंग्लज ३४ २७१०९ २७१२७ ५४२३६ ८१.०८एकूण ४३५ ४०४३५७ ४१५८९१ ८२०२४९ ८४.९१दुपारपर्यंत पडणार गुलालजिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींसाठी आज, मंगळवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील पहिला निकाल गगनबावडा तालुक्यातून लागण्याची शक्यता आहे. कारण या तालुक्यातील ग्रामपंचायती व मतदारांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. त्याचबरोबर दुपारी एकपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींचा निकाल लागून सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या पद्धतीने निवडणूक विभागाने नियोजन केले आहे.