शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत द्या, निधीही द्या; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी 

By समीर देशपांडे | Updated: November 27, 2024 16:30 IST

मुंबईतील बैठकीत अनेकांनी मांडल्या व्यथा

समीर देशपांडेकोल्हापूर : विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. सत्तेत आलो आहोत. अजून बाकीच्या निवडणुका बाकी आहेत. या सगळ्यांमध्ये जिल्हाध्यक्षांनी प्रचंड परिश्रम केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्राला किंमत द्या आणि विकासकामांसाठी निधीही द्या, अशी आग्रही मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत अनेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या व्यथा मांडल्या.यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, माधवी नाईक हे प्रमुख प्रदेश पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या करताना वस्तुस्थितीही मांडली. या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असे, संघटनेचे दैनंदिन कामकाज आम्ही चालवत असतो. राेजची आंदोलने, कार्यक्रम, आगत-स्वागत हे सर्व करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष पार पाडत असतो. प्रचाराच्या नियोजनापासून मोठ्या सभांच्या आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी त्याच्याकडे असते; परंतु निवडणुकीनंतर अनेकदा जिल्हाध्यक्षांना अडगळीत टाकले जाते, अशी व्यथा काही जिल्हाध्यक्षांनी यावेळी मांडली.अनेकदा गाव, वॉर्ड पातळ्यांवरील कार्यकर्त्याला आमदार, खासदार ओळखत नाहीत; परंतु त्याला जिल्हाध्यक्ष ओळखत असतो. त्याला तो कामाला लावत असतो. परंतु त्याचे काम करायचे झाले तर मात्र ते जिल्हाध्यक्ष करू शकत नाही. जिल्हाध्यक्षाच्या पत्राला अशा वेळी किंमत मिळाली पाहिजे. विकासकामांसाठी काही निधीही जिल्हाध्यक्षांच्या पत्रानुसार दिला पाहिजे, अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख नेत्यांच्या आसपास असणाऱ्या ठरावीक मंडळींची महामंडळे आणि समित्यांवर नियुक्ती केली जाते; परंतु यापुढील काळात अशा नियुक्त्या करताना जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देण्यात यावे. याआधी ज्यांना पदे देण्यात आली आहेत, त्यापेक्षा इतरांना संधी द्यावी, अशीही मागणी काहींनी केली.

मंत्रालयात येण्यासाठी पास द्याएका जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आमच्या जिवावर आमदार झालेली व्यक्ती चार कंत्राटदारांचे पास काढून आमच्यासमोर मंत्रालयात जाते. आम्ही मात्र पासच्या रांगेत उभे असतो. हे चित्र बदलले पाहिजे. किमान मंत्रालयात येण्यासाठी तरी आम्हांला पास द्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांची दखल घेण्याची ग्वाही यावेळी बावनकुळे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाministerमंत्रीzpजिल्हा परिषद