पंचायत समिती सभापतींना विकास निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:56+5:302021-03-24T04:22:56+5:30
कसबा सांगाव : पंचायत समितीच्या सभापतींना ग्रामविकास विभागाच्या वतीने विकासकामांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी ...

पंचायत समिती सभापतींना विकास निधी द्या
कसबा सांगाव : पंचायत समितीच्या सभापतींना ग्रामविकास विभागाच्या वतीने विकासकामांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी द्यावा, असे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या सभापतींनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मंगळवारी दिले.
१५ व्या वित्त आयोगातून ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभरातील सर्व पंचायत समित्यांना १० टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो. मात्र, जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीमधून एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे सर्वच तालुक्यांत नाराजी आहे. अनेक कारणांमळे सभापतींना जनतेला सामोरे जावे लागते. त्यावेळी जनतेच्या अनेक मागण्या असतात, त्या निधीच्या अडचणीमुळे पूर्ण करता येत नाहीत.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास विभागाने गत वर्षभरात लोकोपयोगी विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे काम गतिमान झाले आहे, अशा भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी कागल पंचायत समिती सभापती पिनल मगदूम, गडहिंग्लज सभापती रुपाली कांबळे, राधानगरी सभापती वंदना हळदे, आजरा सभापती उदय पवार आदी उपस्थित होते.
---
फोटो कॅप्शन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना कागल पंचायत समिती सभापती पूनम मगदूम, रुपाली कांबळे, उदय पोवार, रुपाली हळदे आदी.