शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भांडणात दाबला गळा; ..अखेर जखमी प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू; प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 17:17 IST

इचलकरंजी : प्रियकराने भांडणात गळा दाबून जखमी केलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. सुरेखा राजू सोलनकर (वय ३३, रा. ...

इचलकरंजी : प्रियकराने भांडणात गळा दाबून जखमी केलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. सुरेखा राजू सोलनकर (वय ३३, रा. चिपरी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन गौतम माने (रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपासासाठी पथक रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील प्रियकर व प्रेयसी दोघेही मूळचे सांगलीचे. ओळखीतून दोघांचे ३ ते ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भेटण्यासाठी ते दोघे शहापूर येथील लक्ष्मीनगर गल्लीत ओमकार लोहार यांच्या मालकीच्या खोलीत येत होते. त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून भांडणं व्हायची. भांडणातून सचिन हा सुरेखा यांना मारहाण करीत होता. शनिवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भांडणात माने याने सुरेखा यांना मारहाण केली. मारहाणीत सचिन याने अंगावर धावून जात गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरेखा या बेशुद्ध झाल्याने त्यांना तिथेच घरात कोंडून बाहेरून दार लावून तो पळून गेला. थोड्यावेळाने तेथे आलेल्या एकाने महिला बेशुद्ध अवस्थेत खोलीत पडल्याचे पाहून खोली मालक व पोलिसांना कळवले. पोलिसांनी जखमी सुरेखा यांना आयजीएम रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान गुरुवारी सुरेखा यांचा मृत्यू झाला. सुरेखा यांचा भाऊ कृष्णा भूपाल दुधाळ (वय ३३) यांच्या फिर्यादीनुसार सचिन माने याच्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये खुनाचा गुन्हा अधिक करण्यात आला असून, सचिन याच्या तपासासाठी शहापूर पोलिसांनी पथके सांगली परिसरात रवाना केली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस