पिंळगावमध्ये गिफ्ट शॉपीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST2021-02-07T04:22:58+5:302021-02-07T04:22:58+5:30
पांगिरे : पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील माऊली गिफ्ट शॉपी दुकानाला शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ...

पिंळगावमध्ये गिफ्ट शॉपीला आग
पांगिरे : पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील माऊली गिफ्ट शॉपी दुकानाला शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागून एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बसस्थानकावर असलेल्या चव्हाण कॉप्लेक्समध्ये भुजंग पावले यांचे माऊली गिफ्ट शॉपी हे गिफ्ट, खेळणी व वह्या-पुस्तकांचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या काही महिलांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी सदाशिव चव्हाण, भुजंग पावले यांना बोलावून घेत आग आटोक्यात आणली. तलाठी कार्यालयाकडून आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. भुजंग पावले यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, या दुकानातील व्यवसायातून त्यांचे कुटुंब चालते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पावले यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन पिंपळगाव व्यापारी संघटनेने केले आहे.