शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गूळ उत्पादकांना जीआयचा होणार फायदा: फसवणुकीला लागणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:30 IST

Agriculture Sector, marketyard, kolhapurnews कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता या मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना जीआय नोंदणीसह प्रशिक्षणासाठी पणन अनुदान मिळणार असून, गुळात होणारी भेसळ व फसवणुकीलाही चाप बसणार आहे.

ठळक मुद्देगूळ उत्पादकांना जीआयचा होणार फायदा: फसवणुकीला लागणार चापनोंदणीसह प्रशिक्षणाला पणन देणार अनुदान

 कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन मिळाले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता या मानांकनाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना जीआय नोंदणीसह प्रशिक्षणासाठी पणन अनुदान मिळणार असून, गुळात होणारी भेसळ व फसवणुकीलाही चाप बसणार आहे.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी कोल्हापूर गूळ म्हणून चार वर्षांपूर्वी मानांकन मिळाले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्नाटक, सांगली येथील गुळाची कोल्हापूरी गूळ या नावाने विक्री होते. त्यामुळे येथील गुळाचा दर घसरत होता.

भेसळ होत असल्याने कोल्हापुरी गुळाची बदनामी होते. यासाठी पणन मंडळाने आता मानांकन प्राप्त शेती उत्पादनाच्या मार्केटिंगकडे लक्ष केंद्रित केले आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी ह्यपणनह्णकडे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रशिक्षण घेतले जाते. त्याचबरोबर शेतीमाल विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देणे व त्यासाठी अनुदानही दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतीमालाच्या ब्रँडिंगसाठी ह्यपणनह्ण पुढाकार घेणार आहे.

नोंदणी, प्रशिक्षण, मार्केटिंगपर्यंत येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के रक्कमही अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही योजना बाजार समिती व पणन मंडळ हे संयुक्तपणे राबवणार असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन पणन मंडळाचे कोल्हापूर विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र