अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ घंटानाद-बोंब मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:57 IST2019-02-04T13:56:03+5:302019-02-04T13:57:14+5:30
लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद-बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारचा निषेध करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद-बोंब मारो आंदोलन करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊनही ५ वर्षांत सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे उपोषण सुरू केले असून, सरकारकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद-बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे अण्णांची तब्येत ढासळत असून, त्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सरकारची भूमिका ढिम्म व निद्राधीन असल्याने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह सरकारला जाग येण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद-बोंब मारो आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्यासह सरकार विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शंखध्वनी केला.
जिल्हा संयोजक नारायण पोवार म्हणाले, एकेकाळी लोकपालबाबत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. परंतु आज याबाबत अनास्था दिसत आहे. भाजपसह हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा असणारा हिरीरीने सहभाग आता दिसत नाही. त्यांच्यासह जनतेने या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची वेळ आली आहे. आंदोलनात उत्तम पाटील, नीलेश रेडेकर, आनंदा गुरव, डॉ. सुरेश पाटील, राजू माने, अभिजित भोसले, आदी सहभागी झाले होते.