शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

पक्ष, राजकारण बघू नका; ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, ग्रामविकासमंत्र्यांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:53 IST

पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेला पाच कोटी रुपयांची बक्षीस देणारी आणि हजारो गावांना कोट्यवधी रुपये देणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही पहिली योजना आहे. त्यामुळे आता पक्ष, राजकारण काही बघू नका. ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी केले.येथील ‘आनंद भवन’ येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेला खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, ‘यशदा’चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर आयुक्त नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते. अर्ध्या तासाच्या भाषणात गोरे यांनी चौफेर उदाहरणे देत सरपंच आणि ग्रामसेवकांना या अभियानामध्ये सक्रिय सहभागासाठी उद्युक्त केले.मंत्री गोरे म्हणाले, या शाहूनगरीने देशाला आणि राज्याला दिशा देणाऱ्या योजना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू होत आहे. सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या जेवढ्या योजना सुरू आहेत, त्याची जरी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तरी गावे समृद्ध व्हायला काहीच वेळ लागणार नाही. सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केली की या अभियानातील ६५ टक्के काम होणार आहे आणि केलेले काम नोंदवले की उरलेले काम पूर्ण होणार आहे.खासदार महाडिक म्हणाले, ही योजना म्हणजे ‘रिव्होल्युशन’ असली तरी त्यासाठी ‘सेल्फ इव्होल्युशन’ म्हणजे आपलेच मूल्यमापन करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावे बदलत आहेत. केरळप्रमाणे आपलीही खेडी बदलली पाहिजेत.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, हे अभियान म्हणजे क्रांती असून, हा २७ पानांचा ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशाचा अभ्यास केला आणि त्यानुसार गावचा कारभार केला तर गावे बाइकच्या नव्हे तर रॉकेटप्रमाणे प्रगती करतील. यावेळी सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.

पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहेया अभियानातील पहिले तीन सरपंच, तीन गटविकास अधिकारी, तीन सीईओ यांना आपल्या घरी दहा मिनिटे चहापानासाठी बोलवावे, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे. ते नकार देणार नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्याला भेटायला जायचे आहे या जिद्दीने कामाला सुरूवात करा, असेही गोरे म्हणाले.