कबड्डी स्पर्धांना रितसर मान्यता घ्या : असोसिएशन

By Admin | Updated: January 17, 2015 00:26 IST2015-01-17T00:25:06+5:302015-01-17T00:26:49+5:30

कबड्डी स्पर्धांच्या शिस्तबद्ध आयोजनाच्यादृष्टीने अनेक निर्णय

Get rid of Kabaddi tournaments: Association | कबड्डी स्पर्धांना रितसर मान्यता घ्या : असोसिएशन

कबड्डी स्पर्धांना रितसर मान्यता घ्या : असोसिएशन

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धांना जिल्हा कबड्डी असोसिएशनची मान्यता घ्यावी, अशा स्पर्धेत संलग्न संघांनी सहभागी होऊ नये अन्यथा त्यांच्यासह सामनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सभेत एकमुखी घेण्यात आला. काल, गुरुवारी शिवाजी स्टेडियम येथील असोसिएशनच्या कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धांच्या शिस्तबद्ध आयोजनाच्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. यावेळी रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू ठेवण्यापेक्षा स्पर्धा लवकर सुरू करण्यावर आयोजकांनी भर द्यावा. एकाच संघातून संलग्नता ठेवावी, यासह अन्य निर्णय या सभेत घेण्यात आले. यावेळी राज्य कबड्डी संघाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रा. संभाजी पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

Web Title: Get rid of Kabaddi tournaments: Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.