शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणीय मूल्य मिळणे शेतकऱ्यांच्या हिताचे:रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:31 IST

कोल्हापूर : शेतकºयांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाषाभवन सभागृहामधील ...

कोल्हापूर : शेतकºयांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाषाभवन सभागृहामधील कार्यक्रमास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे प्रमुख उपस्थित होते.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकरी पिकांच्या माध्यमातून शेतीला पाणी देतो, म्हणजेच तो पृथ्वीचे तापमान कमी करण्यास सहकार्य करीत असतो. देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून देश जगविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करतो. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध उद्योगधंदे व इतर माध्यमांतून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक झाल्याने ते साठवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त पद्धतीने शेतीमध्ये हे करता येणे शक्य आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचा भार कमी होणार आहे. शेतकरी कशाप्रकारे कार्बन साठवणूक करतो, त्याचे मूल्यमापन कसे करणार, यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिटस् मिळविणे शक्य आहे. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, बालेखान मुजावर, गिरीश राऊत, प्रणाली राऊत, ए. डी. जाधव यांच्यासह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बीड, आदी विविध भागांतील शेतकरी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.संस्कारांचा वारसापिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृतीतून शेतीच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, ही आता गरज बनली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्रामीण भाग हे संस्कारांचा वारसा जपणारे मोठे केंद्र आहे; त्यामुळे शेतकºयांचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.