शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गावठाण मिळकतींची मोजणी आता होणार ‘ड्रोन’द्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:45 AM

आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल.

ठळक मुद्देसंडे अँकर । दोन महिन्यांत काम सुरू : ८३६ गावांचा समावेश

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल. यामुळे वेळ वाचणार आहेच, शिवाय हद्दीमुळे होणारे वादाचे प्रकारही कमी होण्यास मदत होणार आहे.

गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या योजना, यामुळे गावात भौगोलिक बदल होत असून, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरूआहे; परंतु ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्याने नेमकी जागा किती आहे? याबाबत सुस्पष्टता नसते. गावठाणामधील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे गरजेचे आहे. मालमत्तेचे मालकीपत्र नसल्याने आर्थिक पतही निर्माण होत नाही; त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी मिळकतींची मोजणी करण्याचे काम शासनाने सुरूकेले आहे. ही प्रक्रिया जलद होण्यासाठी ‘ड्रोन’द्वारे मोजणी केली जाणार आहे. पथदर्थी प्रकल्प म्हणून सोनार्ली (जि. पुणे) येथे राबविला. राज्यभरातील ४० हजार गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यांंत काम सुरू होणार आहे.अशी असणार रचनासुरुवातीला गावांची पाहणी करून ड्रोनद्वारे मोजणीसंदर्भातील माहिती ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना देणेगावाची निवड केल्यानंतर ‘ड्रोन’साठी ग्राऊंड कंट्रोल पॉइंट प्रस्थापित करणे.ड्रोनद्वारे गावाची ‘इमेज’ घेण्यापूर्वी रस्ते व मिळकत यामधील सीमा चुना पावडरने आखणेड्रोनमध्ये मिळकतीची हद्द स्पष्टपणे दिसावी, यासाठी ती हद्द चुना वापरून आखून घेणे.२४ मिनिटांत मोजणीड्रोनद्वारे मोजणीस २४ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यामुळे वेळ वाचणार आहेच, त्याशिवाय अचूकता येणार आहे. जिल्ह्यासाठी तीन कॅमेरे देण्यात येणार आहेत. छायाचित्र डाऊनलोडची प्रक्रिया सर्व्हे आॅफ इंडियाच्या डेहराडून येथील मुख्यालयात आहे.ड्रोन मोजणीचे फायदेपारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोन पद्धती कमी वेळेत, कमी श्रमात, कमी मनुष्यबळाचा वापर करून होतेड्रोन इमेजमुळे कामात पारदर्शकता व अचूकता येते३ डी इमेज प्राप्त होत असल्यामुळे विविध विकासयंत्रणा व विभागांना नियोजन करताना सुलभता येते.दोन वर्षांत काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ ही घेण्यात येणार आहे. यामध्ये आय. टी. आय.चे विद्यार्थी, स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या तरुणांनाही सामावून घेतले जाणार आहे.ड्रोनने मोजणीची गावेकरवीर ७९कागल ४३गडहिंग्लज ५५आजरा ७७चंदगड १३७राधानगरी ९०भुदरगड १००गगनबावडा ४०पन्हाळा ८२शाहूवाडी १२२शिरोळ ०४हातकणंगले ०७एकूण ८३६ 

 

गावठाणातील मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणीचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. जिल्ह्यात एकाचवेळी सर्व तालुक्यांत येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळही घेण्यात येणार आहे.- वसंत निकम, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcctvसीसीटीव्ही