शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग, चालक गंभीर जखमी; मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:53 IST

आंबा: कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. ...

आंबा: कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वळणावर झाडाला धडक बसून टँकरने पेट घेतला. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला. गॅस टँकरने पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली.दरम्यान, आगीत केबीनमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक तरूणांनी धाडसाने वाचवले. तसेच १०८ रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज, शुक्रवारी (दि.१३) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. शाहूवाडी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयगडहून गॅस भरून हा टँकर आला होता. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे चालकाचे नियंत्रण सुडल्याने टँकर एका वळणावरील झाडाला धडकला. यात टँकरच्या केबीनला आग लागली. गॅस टँकरच्या केबीनला आग लागताच गॅसचा स्फोट होईल यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.चालकास पोत्यात घालून सुरक्षितस्थळी हलविलेसुहास आडविलकर, मारूती बोटांगळे, ज्ञानदेव पाटील, संकेत पवार, गुलाब तावरे या तरुणांनी जखमी चालकास पोत्यात घालून सुरक्षितस्थळी हलविले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआगAccidentअपघात