शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरच्या टेम्पोला आग

By admin | Updated: July 31, 2014 23:25 IST

सायबर चौक येथील घटना : सतर्क तेमुळे अनर्थ टळला

कोल्हापूर : वार गुरुवार, वेळ दुपारी दीडची... सायबर चौक ते विद्यापीठ रोडवर गॅस सिलिंडर घेऊन चाललेल्या टेम्पोच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले. हा प्रकार पाहून बिथरलेल्या चालकाने गाडी रस्त्यावरच थांबविली. टेम्पोत भरलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्या पाहून आग विझविण्यासाठी कोणीच पुढे येईना. अखेर एका महिलेने अग्निशामक दलाला फोनवरून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत इंजिनमधील आग आटोक्यात आणली; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. संभाजीनगर येथील संदीप गॅस एजन्सीचा हौदा टेम्पो (एमएच ०९ सीए ६७६५) भरलेली सुमारे ४० गॅस सिलिंडर घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी चालला होता. दुपारी दीडच्या सुमारास सायबर चौकमार्गे विद्यापीठ रोडने संभाजीनगरकडे जाताना अचानक टेम्पोच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन धुराचे लोट बाहेर पडू लागले. चालक शिवाजी बनकर याने गाडी जाग्यावरच थांबविली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हा प्रकार समजताच ते भीतीने पसार होत होते. त्यामुळे आग विझविण्याचे धाडस कोणीच करीत नव्हते. चालक बनकरही झाल्या घटनेने बिथरून गेला होता. टेम्पोमध्ये गॅस सिलिंडर असल्याचे गांभीर्य ओळखून एका जागरूक महिलेने महापालिकेच्या अग्निशामक दलास फोनवरून घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता सायरन वाजवतच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टेम्पोच्या इंजिनचे बॉनेट उघडून पाण्याचा फवारा मारून आग विझविली. त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांचा जीव भांड्यात पडला. आग विझविण्यास विलंब झाला असता, तर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन शहरात मोठी दुर्घटना घडली असती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान भूपाल तराळ, रघुनाथ पाटील, महावीर म्हासुर्ले, अनिल कारंडे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)