शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सायरन वाजवत सुसाट, तीन वाहनांना धडक; रुग्णवाहिकेत होत्या गरबा खेळणाऱ्या तरुणी; कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 11:57 IST

या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

कोल्हापूर : हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात एक चारचाकी आणि दोन दुचाकींना धडक देणाऱ्या सीपीआरच्या भरधाव रुग्णवाहिकेला थांबवले असता त्यात गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी आढळल्याचा प्रकार रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. हा प्रकार समजताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केवळ माहिती घेत रुग्णवाहिका मार्गस्थ केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनाही घरी जाण्यास सांगितले.प्रत्यक्षदर्शी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉकी स्टेडियमसमोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने एक रुग्णवाहिका (एमएच ०९ एफएल ६७०९) सायरन वाजवत भरधाव निघाली होती. तिने एक चारचाकी आणी दोन दुचाकी वाहनांना ओव्हरटेक केले व पुढे जाऊन चारचाकी गाडीला धडक दिली. काही नागरिकांनी पाठलाग केला तेव्हा चालकाशेजारी दोन युवती बसल्याचे लक्षात आले. नॉर्थस्टार हॉस्पिटलसमोर त्यांनी ही रुग्णवाहिका थांबवली. नागरिकही तेथे जमा झाले. त्यांनी रुग्णवाहिकेचे मागचे दार उघडण्यास सांगतिले. सुरुवातीला चालकाने नकार दिला. मात्र, जमाव पाहून त्याने दरवाजा उघडला, तेव्हा आतमध्ये दाटीवाटीने गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी बसल्याचे लक्षात आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून, त्या गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी जाब विचारला आणि जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क केला.गस्ती पथकाने तत्काळ तेथे येत चालकाच्या परवान्याचे छायाचित्र काढून पुन्हा असा प्रकार न करण्याची ताकीद दिली आणि रुग्णवाहिका साेडून दिली व नागरिकांनाही पांगवले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री ११ वाजेपर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात