शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण आकडेवारीत तफावत, अधिसूचना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:13 IST

जिल्हा प्रशासनाकडून सुधारीत आदेश : मंगळवारी सोडत

कोल्हापूर : जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या १०२६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक अधिसूचनेत वाटप केलेली सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणा-या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पद संख्येच्या आकडेवारीत तांत्रिक चूक झाल्याने तफावत झाली आहे. जिल्हा प्रशासनाने १ तारखेला जाहीर केलेली ही अधिसूचना रद्द केली असून त्याचा सुधारित आदेश शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे.जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी हा आदेश काढला असून त्यात शासनाने ५ मार्च २०२५ च्या अधिसूचित आरक्षणानुसार ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण प्रमाण निश्चित केले आहे. सरपंच व महिला आरक्षण मंगळवारी (दि. ८) सोडत पद्धतीने काढण्यात येणार असून त्यासाठी तहसीलदारांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आरक्षण असे 

  • अनुसूचित जाती : १३८ पैकी ६९ महिला
  • अनुसूचित जमाती : ०७ पैकी ४ महिला
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७३ पैकी १३७ महिला
  • सर्वसाधारण : ६०८ पैकी ३०४ महिला
तालुका ग्रामपंचायती अनुसूचित जाती (पुरुष स्त्री) अनुसूचित जमाती (पुरुष स्त्री) नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष स्त्री) सर्वसाधारण (पुरुष स्त्री)
पन्हाळा १११ ८/८०/० १५/ १५ ३२/ ३३
शाहूवाडी १०६ ६/७ १/० १४/१४ ३२/३२
करवीर ११८ ९/१० १/० १५/१६ ३४/३३
गगनबावडा २९ ३/२ ०/० ४/४ ८/८
कागल ८३ ६/६ ०/० ११/११ २५/२४
राधानगरी ९८ ६/५ ०/० १३/१३ ३०/३१
हातकणंगले ६१ ६/६ ०/१ ८/८ १६/१६
शिरोळ ५२५/५ १/१ ७/७ १३/१३
आजरा ७३४/४ ०/० ९/१० २३/२३
भुदरगड ९७ ५/६ ०/० १३/१३ ३०/३०
गडहिंग्लज ८९ ५/५ ०/१ १२/१२ २७/२७
चंदगड १०९ ६/५ ०/१ १५/१४ ३४/३४
एकूण १०२६ ६९/६९ ३/४ १३६/१३७ ३०४/३०४
      

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंचreservationआरक्षणgram panchayatग्राम पंचायत