शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ऊसात लावली गांजाची झाडं, बाप-लेकावर गुन्हा दाखल; साडेसात लाखांचा गांजा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:25 IST

कारवाईपूर्वीच दोघेही फरार

गडहिंग्लज : उसाच्या फडात गांजाची झाडं लावल्याप्रकरणी गडहिंग्लज तालुक्यातील बाप लेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू सर्जाप्पा पिरापगोळ ऊर्फ कांबळे व काशाप्पा विष्णू पिरापगोळ ऊर्फ कांबळे (रा.हेब्बाळ कसबा नूल, ता.गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत.कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१६) सायंकाळी ही कारवाई केली. तब्बल साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईपूर्वीच दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विष्णू आणि काशाप्पा यांनी हेब्बाळ येथील आपल्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेच्या पथकाने हा छापा टाकला. छाप्यात पिरापगोळ यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची ७ ते ८ फुट उंचीची ७५ झाडे मिळून आली. पोलीसांनी १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा ७ लाख ५७ हजार ५० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे.  पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली  पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कवळेकर यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली. पोलिस नाईक महेश गवळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस