सांगलीत पिता-पुत्रावर बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: March 3, 2015 00:42 IST2015-03-03T00:39:04+5:302015-03-03T00:42:58+5:30

डॉ. सुहास खांबे, त्यांचा मुलगा निखिल (दोघे रा. गावभाग सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसांत बलात्कार व विनयंभगाचा गुन्हा दाखल

Gangrape of Sangli's father-son rape | सांगलीत पिता-पुत्रावर बलात्काराचा गुन्हा

सांगलीत पिता-पुत्रावर बलात्काराचा गुन्हा

सांगली : वेळोवेळी केलेल्या मदतीचा गैरफायदा घेत घरात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेवर पिता-पुत्राने बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. सुहास खांबे, त्यांचा मुलगा निखिल (दोघे रा. गावभाग सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसांत बलात्कार व विनयंभगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. खांबे यांची पत्नी वीणा यांच्यावरही त्यांना मदत केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. पीडित महिला पती, मुले, सासू व दिरासमवेत राहते. संशयित खांबे यांची सह्याद्रीनगरमध्ये ‘अ‍ॅनॅलिटीकल लॅब’ आहे. तिथे काम मिळावे, यासाठी महिलेने अर्ज केला होता. खांबेंनी तिला सध्या तेथे जागा नाही, मात्र आपल्या पत्नीची तब्येत बरी नसून घरी स्वयंपाक करण्यासाठी महिला पाहिजे, महिना चार हजार पगार देतो, असे सांगितले. यामुळे ही महिला तयार झाली. स्वयंपाक करताना या महिलेशी खांबेने जवळीक साधली. तिला आर्थिक मदत केली. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी आॅक्टोबर २०१२ पासून बलात्कार केला. त्यानंतर त्यांच्या मुलानेही बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासाठी खांबे यांची पत्नी वीणा यांनी त्यांना मदत केल्याचे म्हटले आहे. २८ फेब्रुवारीला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gangrape of Sangli's father-son rape