शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सराफाला २८ लाखांना लुटले; गोवा, मुंबईत पैसे उडवले, टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 17:44 IST

मुद्देमाल जप्त, जुना राजवाडा पोलिसांची कारवाई; बीसीएचे शिक्षण घेतलेला रोहित केसरकर हा टोळीचा प्रमुख

कोल्हापूर : सराफांना होलसेल दागिने पुरविणारे व्यावसायिक दादा नामदेव मेटकरी (रा. चंबुखडी, कोल्हापूर) यांचा पाठलाग करून पाच ते सहा जणांच्या सराईत टोळीने त्यांच्याकडील २८ लाखांची रोकड हिसकावून लंपास केली होती. १४ फेब्रुवारीच्या रात्री देवकर पाणंद येथे घडलेल्या लूटमारीचा छडा लावण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले.सहा जणांच्या टोळीला अटक करून लुटीतील २४ लाखांची रोकड, दोन दुचाकी आणि पाच मोबाइल असा २८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी रविवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.टोळीप्रमुख रोहित नारायण केसरकर (वय २८, रा. बोंद्रे गल्ली, शिवाजी पेठ), रणजित मधुकर कोतेकर (वय ३५, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर), स्वप्निल सुकलाल ढाकरे (वय २६, रा. राजेंद्रनगर), सौरभ लक्ष्मण शिवशरण (वय २४, रा. राजेंद्रनगर), तुषार जयसिंग रसाळे (वय २८, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), ओमकार विजय शिंदे (वय २९, रा. काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) अशी अटकेतील सहा जणांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता, त्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.निरीक्षक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक मेटकरी हे जिल्ह्यातील सराफांना होलसेल दागिने पुरविण्याचे काम करतात. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांकडून दागिन्यांचे पैसे जमा करून मित्रासोबत ते चंबुखडी येथील घरी निघाले होते. त्यावेळी देवकर पाणंदजवळ दोन दुचाकींवरून पाठलाग करीत आलेल्या चौघांनी मेटकरी यांना अडवले. धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील २८ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.याबाबत मेटकरी यांनी १७ फेब्रुवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुजरी ते देवकर पाणंद मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सहा संशयितांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस हवालदार परशुराम गुजरे, सागर डोंगरे, सतीश भांबरे, प्रशांत घोलप, अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे, उत्तम गुजरे यांनी गुन्ह्याचा तपास केला. रसाळे याच्याकडून मेटकरींचा पाठलागपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १४ फेब्रुवारीला दिवसभर संशयित तुषार रसाळे हा सराफ व्यावसायिक मेटकरी यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर लूटमारीचा उलगडा झाला.

गोवा, मुंबईत उडवले लुटीतील पैसेकेसरकर याच्या टोळीने सराफाचे २८ लाख लुटल्यानंतर थेट गोवा गाठले. गोव्यात मौजमजा केल्यानंतर ते मुंबईला पोहोचले. तिथेही त्यांनी जिवाची मुंबई करीत पैसे खर्च केले, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.

सराईत टोळीचे कृत्यबीसीएचे शिक्षण घेतलेला रोहित केसरकर हा टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यासह रणजित कोतेकर आणि स्वप्निल ढाकरे यांच्यावर मारामारी, चोरी, दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस