पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील नवलेवाडी येथील घराच्या शेडमध्ये रानडुकराचे मांसाचे वाटे घालत असताना चौघा शिकाऱ्यांना करवीर आणि पन्हाळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. पन्हाळा पश्चिम भागात घडलेल्या या घटनेच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीकडून कोयता, सत्तूर, दोन मोटारसायकलींसह डुकराचे मांस ताब्यात घेतले आहे. संशयित चौघा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांनी दिली.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवलेवाडी येथील विनायक संभाजी वैद्य यांच्या शेडमध्ये जंगलात शिकार केलेल्या रानडुकराच्या मांसाचे विक्रीसाठी वाट घालत असल्याची गोपनीय माहिती पणुत्रेचे वनरक्षक अश्विनी मदने यांना मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने दुपारी दोनच्या सुमारास वैद्य यांच्या शेडमध्ये विक्री करण्यासाठी घातलेल्या मांसाच्या वाट्यासह आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली. सरदार संभाजी पाटील (रा. वाकरे, ता. करवीर), विनायक संभाजी वैद्य, रतन हिंदुराव नवलव (दोघे रा. नवलेवाडी, ता. पन्हाळा), रमेश पांडुरंग पाटील रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पन्हाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पणुत्रे वनरक्षक अश्विनी मदने, वनरक्षक अमर माने, बाजीराव देसाई, विदेश तांबरे, महादेव कुंभार, संदीप पाटील, वन्यजीव बचाव पथक सदस्य अजिंक्य बच्चे, किरण कुंभार, रोहित जाधव, अभिजित पाटील यांनी कारवाई केली.
Web Summary : Four poachers were arrested near Navlewadi, Kolhapur, while butchering wild boar meat. Forest officials seized the meat, weapons, and motorcycles. The accused will appear in court Wednesday.
Web Summary : कोल्हापुर के नवलेवाड़ी के पास जंगली सुअर का मांस काटते समय चार शिकारियों को गिरफ्तार किया गया। वन अधिकारियों ने मांस, हथियार और मोटरसाइकिलें जब्त कीं। आरोपियों को बुधवार को अदालत में पेश किया जाएगा।