शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav : कोल्हापूर जिल्ह्यात ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’गणेशोत्सवात ७१३० मंडळांचा समावेश

कोल्हापूर : जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याची परंपरा गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील गावागावांत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव शांततेत व डॉल्बीविरहित साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला असून, ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ व सुमारे १२०० गावांत ‘डॉल्बी मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

मंडळांनी सीसीटीव्हीसाठी पुढाकार घ्यावा‘एक खिडकी योजने’च्या माध्यमातून गणेश मंडळांना एका छताखाली सर्व परवाने दिले जात आहेत. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याची दक्षता घेतली आहे, देखावे व विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत; जेणेकरून या ठिकाणी येणाºया महिला, बालके सुरक्षित राहतील.

गणेशोत्सवात अनेक मंडळे गोरगरिबांना आर्थिक मदत, वह्या-पुस्तकांचे वाटप करीत असतात. विधायक कामाला हातभार लावणाऱ्या अशा मंडळांनी सीसीटीव्हीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर