शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापुरातील गणेशभक्ताची सलग १७ वर्षे 'अंगारकी संकष्टीला' गणपतीपुळेची 'पायी वारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 11:49 IST

गेली दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे अशा पावसातुनही कुंभार हे आजच्या अंगारकी संकष्टीला गणपतीपुळेला पायी चालत गेले आहेत.

अनिल पाटीलसरुड : सरूड ते गणपतीपुळे हे अंतर आहे तब्बल १२५ किलोमीटरचे. आंबा घाटातील वेडीवाकडी वळणे,चढउताराचा रस्ता आणि सोबतीला ऊन, वारा, पाऊस, दाट धुके एकंदरीत ही तशी अवघड वाट. पण हीच अवघड वाट सुभाष कुंभार या सरुडच्या गणेशभक्ताला खूप सोपी वाटते. अंगारकी संकष्टी आली की सरुडच्या या गणेशभक्ताची पावले आपोआप वळतात ती गणपतीपुळ्याच्या दिशेला. गेली सतरा वर्षे प्रत्येक अंगारकी संकष्टीला सरुड ते गणपतीपुळे न चुकता पायी वारी ते करीत आहेत.१० मे २००५ रोजीच्या अंगारकी संकष्टीला सुभाष कुंभार यांनी प्रथम गणपतीपुळेला श्री गणेशाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याचा निर्धार केला. दोन दिवसात कुंभार यांनी हे अंतर पार करत गणपतीपुळे गाठले. त्यानंतर पुढील १७ वर्षात आलेल्या ४४ अंगारकी संकष्टीला कुंभार हे न चुकता श्री गणेश दर्शनासाठी गणपतीपुळेला गेले आहेत. गेली दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे अशा पावसातुनही कुंभार हे आजच्या अंगारकी संकष्टीला गणपतीपुळेला पायी चालत गेले आहेत.दोन दिवसांचा चालत प्रवासरविवारी  पहाटे साडेपाच वाजता सरुड येथून कुंभार यांचा पायी प्रवास सुरू होतो. ६५ कि. मी. चे अंतर पार करत  रविवारी सांयकाळी ते करंजाळी ( जि . रत्नागिरी ) येथे मुक्कामाला थांबतात. दुसऱ्या दिवशी सोमवारी पुन्हा पहाटे साडेपाच वाजता करंजाळी येथून प्रवास करत दुपारी १२ च्या सुमारास नरंबे या गावात विश्रांती साठी थांबतात. दुपारी ३ च्या सुमारास आपला प्रवास सुरु ठेवत रात्री आठच्या वाजता ते गणपतीपुळे येथे पोहचतात. मंगळवारी सकाळी श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराशेजारील डोंगराला पाच चालत प्रदक्षिणा घालून ते भाविकांच्या गाडीतुन सरुडला परततात.  

लहानपणा पासुनच मला गणेशभक्तीची आवड आहे. भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीतुन पायी चालत पंढरपूरला जातात. याच प्रेरणेतुन मी ही श्री गणेशाच्या दर्शनासाठी सरुड हून गणपतीपुळे येथील श्री गणेशाच्या दर्शनाला प्रत्येक अंगारकी संकष्टीला पायी चालत जाण्याचा  संकल्प केला. या संकल्पनेतुनच गणपतीपुळेला चालत जाऊ लागलो. भविष्यातही येणाऱ्या प्रत्येक अंगारकी संकष्टीला पायी चालत जाण्याची माझी ही १७ वर्षाची परंपरा मी अखंडितपणे सुरु ठेवणार आहे -  सुभाष कुंभार, गणेशभक्त

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीGanesh Mahotsavगणेशोत्सव