निट्टूरचे गणेश विद्यामंदिर : ई-लर्निंगचा आदर्श वस्तुपाठ

By Admin | Updated: July 9, 2015 00:22 IST2015-07-09T00:22:42+5:302015-07-09T00:22:42+5:30

-गुणवंत शाळा

Ganesh Vidyamandir of Nittur: Ideal object tee of e-learning | निट्टूरचे गणेश विद्यामंदिर : ई-लर्निंगचा आदर्श वस्तुपाठ

निट्टूरचे गणेश विद्यामंदिर : ई-लर्निंगचा आदर्श वस्तुपाठ

चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक. ग्रामीण व कोकणसदृश येथील भौगोलिक व नैसर्गिक स्थिती आहे. कुटुंबं तशी शेती व दुग्ध व्यवसायावर गुजराण करणारी. मात्र, श्री गणेश विद्यामंदिर निट्टूर गावची शाळा ही अद्ययावत ज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम व आधुनिक तंत्रसाधनाने अध्यापन करणारी आहे. निट्टूरची ही शाळा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील ई- लर्निंगचे पहिले विद्यामंदिर आहे. लोकसहभागातून सुरू झालेली आणि सर्व गावाने उचलून धरलेली ही सुविधा आहे.
निट्टूर गावची लोकसंख्या दोन हजार पाचशेच्या आसपास आहे. श्री गणेश विद्यामंदिरमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग असून, शिक्षक संख्या
पाच आहे. येथे राजगोळे हे मुख्याध्यापक असून, त्यांचे प्रशासन उत्कृष्ट आहे. १६ सदस्यांची
शाळा व्यवस्थापन समिती सक्रिय करण्यात, चंदगड पंचायत
समितीचे लक्ष वेधण्यास, महिला सरपंचाचे व सदस्यांचे सहकार्य मिळविण्यात राजगोळे वाकबगार आहेत. शिक्षक कुंभार,
लोहार, श्रीमती सरवणकर, सौ. नार्वेकर आणि ‘टीम वर्कचे फलित’ म्हणजे गुणवत्तेची हमी हे सिद्ध झाले आहे.
‘ई-लर्निंगचा काय फायदा झाला, असे विचारले असता राजगोळे म्हणाले, मल्टीमीडिया प्रभावामुळे मुलांच्या शिकण्यात रंजकता आली. मुलांसाठी स्वयंअध्ययनासाठी अत्यंत सुलभ शब्द व वाक्यरचना करता आली. मुलांसाठी मुलांच्या मदतीने ४०० हून अधिक ई-बुक्सचे ई -ग्रंथालय, शिष्यवृत्ती व सामान्यज्ञानसारख्या सराव चाचण्यांचे पेपरलेस आणि भरपूर सराव सुविधा देण्यात येत आहे. परिपाठात हायटेक वापरून विशेषत: बातम्यांचे प्रेझेंटेशन, सुविचार, प्रबोधनपर माहिती, दिनविशेष, इ. आॅफलाईन आणि आॅनलाईनद्वारा खूप माहिती व डाटा याचा अध्यापनात उपयोग होतो. हे सगळं सांगत ते प्रत्यक्षात दाखवतही होते. मुलं स्वत: वापर करताना पाहिले. आजूबाजूच्या शाळा व शिक्षक ही सुविधा पाहून जात असून, त्यापासून प्रेरणाही घेत आहेत.
शाळेतील सर्व मुलांच्या वाढदिवसाचा महिनानिहाय आलेख, तक्ता व तोही परमनंट लॅमिनेशन करून लावलेला. आलेख घटकांचे अध्यापन या प्रकारे. फोटोसह आलेख टांगलेला मुलांना आगळा-वेगळा आनंद देणारा, प्रकट वाचनावर भर, लेखनाचा सराव, स्वाध्याय हस्तपुस्तिकेचा वापर, गणिती खेळ, भाषाकौशल्य वाढविण्याचे उपक्रम, कृतिशील अध्यापन, स्वयंअध्ययनावर भर, गट पद्धती, कुल तयार करून अध्ययनास प्रेरणा हे सगळं नियोजन पद्धतीने काटेकोरपणे केले जात
आहे. ज्ञान, प्रगती आणि विकास हे शाळेचे तीन पैलू आणि त्या
पैलूंना झळाळी देणारे, गुणवत्तेसह पुढे नेणारे, कर्तव्यनिष्ट व कमिटेड शिक्षक.
लोकसहभागातून दोन लाख ६० हजार एवढी रक्कम उभी राहण्यात मिळवलेले यश. खरोखरच ज्ञानरचनावाद प्रत्यक्षात अध्यापन व अध्ययन आणणारे हे शिक्षक. कृतिशील अध्यापनाचा ध्यास व त्यासाठी प्रयत्न करणारे खास असे हे गुरूजन, ई-लर्निंग माध्यम तर अध्यापनासाठी नेहमीच वापरतात. मुलंही ते तंत्र वापरण्यास सरावले व सरसावलेले. खरोखरच श्री गणेश विद्यामंदिर निट्टूर प्राथमिक शाळा आय.एस.ओ. मार्क लाभण्यायोग्यच!

- डॉ. लीला पाटील

Web Title: Ganesh Vidyamandir of Nittur: Ideal object tee of e-learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.