शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात यंदा गणेश मिरवणुका एकाच दिवशी, पोलिसांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:07 IST

वाहतूक कोंडीने शहर होते त्रस्त, पोलिसांवर वाढतो ताण

कोल्हापूर : गणेश आगमन आणि विसर्जनासाठी मंडळे सोयीनुसार मिरवणुका काढतात. आगमनाला तर चार-पाच दिवस शहरात कुठेना कुठे मिरवणूक सुरूच असते. मात्र, यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.गणेशोत्सव हा धार्मिक सण आहे. त्याचे पावित्र्य जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. तिथी, मुहूर्त, प्रमाण वेळा यानुसारच सण साजरे केले जातात. याचे भान ठेवून सार्वजनिक मंडळांनी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्यावर्षी शहरात अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीपासून ते अगदी पाचव्या दिवसापर्यंत आगमन मिरवणुका सुरू ठेवल्या. ढोलताशे, ध्वनियंत्रणा, लेसर शो आणि विद्युत झगमगाट करून रस्ते अडवले.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास झाला. रुग्णालये, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांनाही रोजच्या मिरवणुकांचा त्रास झाला. एका मंडळाने तर महाद्वार रोडवरील मिरवणुकीत पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण देत अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून पोलिस यंत्रणा आणि नागरिकांना वेठीस धरले. असे प्रकार टाळण्यासाठी सर्व मंडळांनी आगमन आणि विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सर्व पोलिस ठाण्यांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन याबाबत सूचना दिल्या जात आहेत. मंडळांनी याचे काटेकोर पालन करावे, अन्यथा विनापरवानगी मिरवणुका काढणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

ध्वनियंत्रणांचे कारण नकोमिरवणुकांसाठी ढाल पथके, ध्वनियंत्रणा, लेसर शोची यंत्रणा एकाच दिवशी सर्वांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोयीच्या दिवशी मिरवणूक काढत असल्याचे कारण मंडळांकडून दिले जाते. मात्र, धार्मिक उत्सवात मुहूर्त आणि वेळेला महत्त्व असल्याने इतर वेळी मिरवणुका काढून चुकीचा पायंडा पाडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकाच परिसरातील दोन-तीन मंडळांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्याचा पर्याय पोलिसांनी सुचवला आहे. यातून वेळ आणि पैशांचाही बचत होऊ शकते.

गेल्यावर्षी तीन मंडळांवर गुन्हेगेल्यावर्षी विनापरवानगी मिरवणूक काढल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले. यात उमा टॉकीज परिसरातील दोन आणि जुना बुधवार पेठेतील एका मंडळाचा समावेश आहे. त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना अजून न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अशी कारवाई टाळण्यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस