शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गणेश आगमनादिवशी गडमुडशिंगीत खून, चौघांवर गुन्हा, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 6:21 PM

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा चौकात धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी गणेश आगमनादिवशी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देगडमुडशिंगीत गणेशभक्ताचा खूनचौघांवर गुन्हा, तिघांना अटक : वातावरण तणाव

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा चौकात धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी गणेश आगमनादिवशी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी गांधीनगर पोलीसांनी वडील दोन मुलांसह चौघांना मंगळवारी अटक केली. संशयित आरोपी दिलीप यल्लपा कांबळे (वय ५५), त्याची मुले पद्मजीत (२४), पंकज (२१), नातेवाईक रोहित मोहन कांबळे (४२, सर्व रा. गडमुडशिंगी) अशी त्यांची नावे आहेत.संशयितांच्या घराशेजारी ऋषिकेश कांबळे हा मंडळाचा गणपती बसविणार होता. त्याला विरोध केला होता. परंतु ऋषिकेशने मी गणपती याठिकाणीच बसविणार अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यात वादावादी होवून संशयितांनी त्याचा चाकु व दगडाने ठेचून खून केला.गणरायाचा आगमानादिवशीच ही घटना घडल्याने गावात तणाव पसरला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आनली. करवीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देवून मृताच्या नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन करीत आरोपींना तत्काळ अटक करण्याची ग्वाही दिली.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, ऋषीकेश कांबळे व संशयित पंकज कांबळे हे मित्र होते. मे महिन्यामध्ये पंकजचा भाऊ पद्मजीतचे लग्न झाले. या लग्न कार्यक्रमात एक हजार रुपये व दोन मोबाईल चोरीला गेले होते. त्याचा संशय ऋषीकेशवर घेतला होता. त्यातून दोन्ही कुटूंबात वादावादी झाली होती. संशयितांच्या मनामध्ये तो राग होता. सोमवारी गावात गणेश आगमनामुळे उत्साहाचे वातावरण होते.

ऋषीकेशच्या मित्रांनी गल्लीमध्ये गणपती बसविण्याची तयारी केली होती. संशयितांच्या घराशेजारी गणपती बसविणार असल्याने त्यांनी विरोध केला. परंतु ऋषीकेशने  याच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय घेतला. रात्री नऊच्या सुमारास गणेशाची प्रतिष्ठापना झालेनंतर संशयितांनी ऋषीकेशला अडवून जाब विचारला.

यावेळी झालेल्या वादावादीतून पंकजने चाकुने छाती व पोटावर वार केले. तर पद्मजीतने डोक्यात दगड घातला. गल्लीमध्ये हल्ला झाल्याने काही नागरिकांनी पुढे जावून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तुम्ही कोणी मध्ये पडू नका, आता याला ठेवतच नाही असे म्हणून बापलेकांनी दगड, विटांनी ठेचून गंभीर जखमी केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋषीकेशला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच गडमुडशिंगी गावात तणाव पसरला. गांधीनगरचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तत्काळ संशयितांना अटक केली. संशयितांच्या घरातील अन्य लोक भितीने नातेवाईकांकडून घराला कुलूप लावून गेले आहेत. पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मृत ऋषीकेशचा भाऊ विनायक कांबळे याने गांधीनगर पोलीस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली.मृत ऋषीकेशच्या घरची पार्श्वभूमीऋषीकेशचे वडील माळी कामगार होते. त्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आई गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडे सफाई कामगार म्हणून काम करते. थोरला भाऊ विनायक हा कोल्हापुरात खासगी नोकरी करतो. ऋषीकेश हा सातवी नापास होता. तो सेंट्रींगची कामे करीत होता. 

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर