Ganesh Chaturthi 2018 :म्हाकवेतील झांजपंथकाचा राजधानीत कलाविष्कार, सिध्देश्वर मंडळाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:23 IST2018-09-22T17:16:34+5:302018-09-22T17:23:32+5:30
राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

Ganesh Chaturthi 2018 :म्हाकवेतील झांजपंथकाचा राजधानीत कलाविष्कार, सिध्देश्वर मंडळाची निवड
(म्हाकवे ) कोल्हापूर : राजधानी नवी दिल्ली येथिल महाराष्ट्र सदनातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी म्हाकवे (ता.कागल) येथिल सिध्देश्वर झांजपंथकाची निवड करण्यात आली असून सव्वाशेहून अधिक सदस्यसंख्या असणाऱ्या या मंडळातील निवडक ५५ सदस्य (खेळाडू) दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
१९८३ मध्ये बाल अवधूत सोंगी भजन स्थापन करून या मंडळाने लोककलेच्या जिल्ह्यासह सीमावाशियाच्या मनोरंजन केले.तर गेल्या पंधरा वर्षापासून झांजपंथकाच्या माध्यमातून अनेक मैदानी प्रात्यक्षिके करत असतात.
त्यांच्या या लोककलेला दाद देत खासदार धनंजय महाडिक यांनी या मंडळाला राजधानीत आपली कला सादर करण्याची संधी दिली. पहिल्यांदाच या मंडळाला ही संधी लाभली आहे. यामध्ये समईनृत्य, झांजपंथक, टिपरीनृत्य आदी कलाप्रकाराचे सादरीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सदनपासून चांदणी चौक, लाल किल्ला मार्गे यमुना नदीत गणरायाचे विसर्जन केले जाते. यासाठी म्हाकवे शाखा युवाशक्तीचे प्रमुख रामदास गुरव,अशोक पाटील, राहूल पाटील, दशरथ कुंभार आदी परिश्रम घेत आहेत.