गांधीनगरात वादळी पावसाने झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:22 IST2021-05-16T04:22:13+5:302021-05-16T04:22:13+5:30

गांधीनगर येथील गांधी पुतळ्याशेजारी वादळी पावसाने मोठे झाड रस्त्यावर कोसळले. हरे माधव मंदिर येथेही झाड कोसळले. वळीवडे हद्दीत हुले ...

In Gandhinagar, trees fell due to heavy rains | गांधीनगरात वादळी पावसाने झाडे कोसळली

गांधीनगरात वादळी पावसाने झाडे कोसळली

गांधीनगर येथील गांधी पुतळ्याशेजारी वादळी पावसाने मोठे झाड रस्त्यावर कोसळले. हरे माधव मंदिर येथेही झाड कोसळले. वळीवडे हद्दीत हुले मळा येथील कवरराम कॉलनीमध्ये मोठ्या तीन इमारतींवरील पत्र्याचेे शेड वादळाने कोसळल्याने इमारतीखाली पार्क केलेल्या तीन दुचाकी व एका चारचाकीचे नुकसान झाले, तसेच शेडचा काही भाग इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या काचेच्या खिडक्यांवर पडल्याने इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

फोटो : १५ गांधीनगर पाऊस

ओळ- १):- गांधीनगर येथे झालेल्या वादळी पावसामुळे झाडे रस्त्यावर पडली. २) कवरराम कॉलनीत इमारतीचे शेड पडल्याने इमारतीसह दुचाकी व चारचाकीचे मोठे नुकसान झाले. (छाया : बाबासाहेब नेर्ले)

Web Title: In Gandhinagar, trees fell due to heavy rains