गडहिंग्लजच्या जरळी यांची म्हैस ‘गोकुळ श्री’ची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:01+5:302020-12-15T04:40:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वतीने घेण्यात आलेल्या जास्तीत जास्त दूध उत्पादन स्पर्धेत म्हैस गटात गडहिंग्लजच्या वंदना संजय ...

Gadhinglaj's Jarali's buffalo is the standard bearer of 'Gokul Shri' | गडहिंग्लजच्या जरळी यांची म्हैस ‘गोकुळ श्री’ची मानकरी

गडहिंग्लजच्या जरळी यांची म्हैस ‘गोकुळ श्री’ची मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या वतीने घेण्यात आलेल्या जास्तीत जास्त दूध उत्पादन स्पर्धेत म्हैस गटात गडहिंग्लजच्या वंदना संजय जरळी यांची म्हैस तर गाय गटात कसबा सांगावचे किरण चौगले यांची गाय ‘गोकुळ श्री’ची मानकरी ठरल्या.

‘गोकुळ’च्या वतीने दरवर्षी ‘गोकुळ श्री‘ स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ७ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या स्पर्धेत ७८ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी सहभाग घेतल्याने चुरस निर्माण झाली होती. जरळी यांच्या म्हशीने एका दिवसात १९.५४० लिटर तर चौगले यांच्या गायीने ३७.२१५ लिटर दूध देत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेमुळे उत्पादकांना प्रोत्साहन मिळत असून त्या माध्यमातून दूध संकलन वाढीचाही उद्देश सफल होत असल्याचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.

स्पर्धा निकोप घेण्याबरोबरच उत्पादकांना दूधवाढीसाठी पाठबळ देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरत आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी केले.

स्पर्धेतील विजेते असे-

म्हैस गट

उत्पादक व संस्थेचे नाव दूध उत्पादन बक्षीसाची रक्कम

वंदना जरळी, ‘लक्ष्मी’ गडहिंग्लज १९.५४० २५ हजार

अमर पाटील, ‘हरहर महादेव’, चिखली (कागल) १९.१३० २० हजार

वंदना जरळी, ‘लक्ष्मी’ गडहिंग्लज १९.०१० १५ हजार

गाय गट

किरण चौगले, ‘जनसवा’, कसबा सांगाव ३७.२१५ २० हजार

अमोल मगदूम, माणगाव, हातकणंगले ३४.८०५ १५ हजार

अनिकेत पाटील, ‘गंगोलिंग’ व्हनगुत्ती ३२.३५० १० हजार

- राजाराम लोंढे

Web Title: Gadhinglaj's Jarali's buffalo is the standard bearer of 'Gokul Shri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.