मुंबईच्या मैदानात ‘गडहिंग्लज’ला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:55+5:302021-03-31T04:23:55+5:30
पहिल्या सामन्यात गडहिंग्लज संघाने मुंबईच्या इंडिया रश ब्लू संघाचा २-० ने पराभव केला. दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात ठाण्याच्या इलाईट सॉकर ...

मुंबईच्या मैदानात ‘गडहिंग्लज’ला उपविजेतेपद
पहिल्या सामन्यात गडहिंग्लज संघाने मुंबईच्या इंडिया रश ब्लू संघाचा २-० ने पराभव केला. दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात ठाण्याच्या इलाईट सॉकर स्कूल संघावर शेवटच्या क्षणी १-० ने मात केली. उपांत्य सामन्यात मुंबईच्या स्पोर्टसिअन क्लब संघावर १-० ने मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या गोलर इंडियन फुटबॉल अॅकॅडमीने १-० ने आघाडी घेतली.
मुंबईकडून ध्रुव शुक्ला याने मैदानी गोल करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी गडहिंग्लजच्या महांतेश सुळकुडे यानेही अप्रतिम गोल करून बरोबरी साधली. मात्र, टायब्रेकरमध्ये मुंबई संघाने ३-२ ने विजय मिळविला.
उपविजेत्या संघात समर्थ गुंठे, महांतेश सुळकुडे, विक्रांत माने, आर्यन घार्वे, अलोक पाटील, रणवीर कुराडे, आयुष्य क्षीरसागर यांचा समावेश होता.
संघाला रवीकिरण म्हेत्री, चेतन खातेदार यांचे मार्गदर्शन तर महेश सलवादे, संतोष सलवादे, शेखर बारामती, पृथ्वीराज बारामती, पवन कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.
----------------------
फोटो ओळी : मुंबई येथे झालेल्या ड्रीम फुटबॉल लिग २०२१ या स्पर्धेतील उपविजेता गडहिंग्लजचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लबचा संघ.
क्रमांक : ३००३२०२१-गड-०३