गडहिंग्लजला आज रॅपिड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:02+5:302021-05-09T04:24:02+5:30

उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका प्रशासनातर्फे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. ...

Gadhinglaj Rapid Test today | गडहिंग्लजला आज रॅपिड टेस्ट

गडहिंग्लजला आज रॅपिड टेस्ट

उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका प्रशासनातर्फे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

तपासणीनंतर पॉझिटिव्ह आलेले व लक्षणेसदृश असलेल्या नागरिकांना तत्काळ अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

---------

नियम माेडणाऱ्या १८७२ जणांवर कारवाई

गडहिंग्लज : कोरोना संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८७२ जणांवर गडहिंग्लज पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरात विनामास्क फिरणार्‍या तब्बल १७२६ जणांनाही कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी ३० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोहिमेत १०१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणार्‍या १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gadhinglaj Rapid Test today