गडहिंग्लजला गुरुवारी झुंबड, शुक्रवारी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:25+5:302021-05-08T04:25:25+5:30
केंद्रावर उपलब्ध लसींपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. गडहिंग्लजसह आजरा, गारगोटी, कागल तालुक्यांतील नागरिकांनी येथील केंद्रावर लस घेण्याचा प्रकार ...

गडहिंग्लजला गुरुवारी झुंबड, शुक्रवारी नियोजन
केंद्रावर उपलब्ध लसींपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. गडहिंग्लजसह आजरा, गारगोटी, कागल तालुक्यांतील नागरिकांनी येथील केंद्रावर लस घेण्याचा प्रकार घडला. त्यामुळे गडहिंग्लजच्या नागरिकांनी प्राधान्याने आपल्याला लस देण्याबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिल्या.
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिक आणि दुसरा डोस घेण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध आहे. परंतु, लसींच्या प्रमाणात नागरिकांची गर्दी व रांगा यामुळे सोशल डिन्स्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. सकाळपासून नागरिकांना उन्हात रांगेत उभे राहूनही लसीविना माघारी परतावे लागले.
या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने केंद्रावर नेटके नियोजन केले. नागरिकांना उन्हात उभे राहावे लागणार नाही. यासाठी मंडप उभा करण्यात आला. तसेच उपलब्ध लसी इतक्याच नागरिकांना केंद्रावर प्रवेश देण्यात आला.
----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलवर गुरुवारी लसीकरणास झालेल्या गर्दीचा शहरात चर्चेचा विषय बनल्यानंतर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याने शुक्रवारी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी असे सोशल डिन्स्टन्सिंग पाळले. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : ०७०५२०२१-गड-०७