गडहिंग्लजला आठवडी बाजाराचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST2021-04-10T04:24:51+5:302021-04-10T04:24:51+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे गडहिंग्लजला शुक्रवारीच दर रविवारी भरणाऱ्या आठवडी ...

गडहिंग्लजला आठवडी बाजाराचे स्वरूप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे गडहिंग्लजला शुक्रवारीच दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्वरूप पहायला मिळाले.
पुढील दोन दिवस लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद राहणार या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. दुकाने बंद राहिल्यामुळे काही खरेदी करता येणार नसल्याने गडहिंग्लजकरांनी शुक्रवारीच शहराला बाजाराचे स्वरूप आणले.
भाजीपाला, फळविक्रेते, किराणा व अन्य दुकानांसमोर आणि बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली.
शहरातील मुख्य रस्त्यासह लक्ष्मी रोड, लक्ष्मी मंदिर परिसर, नेहरू चौक, बाजारपेठ, बसवेश्वर पुतळा परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली. बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
----------------------
* फोटो ओळी : विकेंड लॉकडाऊच्या भीतीने गडहिंग्लजच्या लक्ष्मी मंदिर परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी अशी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला.
क्रमांक : ०९०४०२०२१-गड-११