शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर संचालक मंडळाकडे आला. ब्रिस्क कंपनी व संचालकांच्या संयुक्त ...

गडहिंग्लज :

अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर संचालक मंडळाकडे आला. ब्रिस्क कंपनी व संचालकांच्या संयुक्त बैठकीतील चर्चेअंती साखर संचालक तथा कारखाना हस्तांतरण समिती प्रमुख डॉ. संजयकुमार भोसले यांनी कारखान्याचा ताबा आज, शुक्रवारी सायंकाळी संचालक मंडळाकडे सुपुर्द केला. १० वर्षांचा करार संपायला अजून २ वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने ठरल्याप्रमाणे कारखान्याला अखेर रामराम ठोकला.

हरळी (ता. गडहिंग्लज) येथे कारखान्याच्या कार्यस्थळावर ही बैठक झाली. यावेळी डॉ. भोसले, प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव, लेखापरीक्षक पी. ए. मोहळकर व शीतल चोथे, ‘ब्रिस्क’चे जनरल मॅनेजर वसंत गुजर, फायनान्स मॅनेजर आनंदा लोहार, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला.

भोसले म्हणाले, ब्रिस्क व कारखाना यांच्यातील येणी-देणीसंदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक व लेखापरीक्षक येत्या आठवडाभरात दोन्ही घटकांशी समोरासमोर चर्चा करून त्याचा अहवाल साखर आयुक्तांना देतील. त्यानंतरच सहकार सचिव येणी-देणीबाबत अंतिम आदेश देतील.

शिंदे म्हणाले, ऊस बिले, कामगारांची थकीत व अन्य देणी कंपनीने महिन्याच्या आत द्यावीत.

चव्हाण म्हणाले, थकीत देणीबाबत कंपनीकडून लेखी हमी घ्यावी.

नलवडे म्हणाले, घाईगडबडीने कारखान्याचा ताबा देण्यात दडपशाहीचा वास येतो. आवश्यकता भासल्यास कंपनीकडून पेनल्टी वसूल करावी.

यावेळी संचालक बाळासाहेब मोरे, संभाजी नाईक, दीपक जाधव, सतीश पाटील, अमर चव्हाण, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, बाळकृष्ण परीट, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, क्रांतीदेवी कुराडे व जयश्री पाटील, साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी शशीकांत चोथे उपस्थित होते.

--------------------------------------

*

पंचनामा व ऑडिटची मागणी ‘ब्रिस्क’च्या कार्यकाळातील कारखान्याचे नुकसान स्पष्ट होण्यासाठी कारखाना आवारातील भौतिक स्थितीचा पंचनामा व मशिनरीच्या टेक्निकल ऑडिटसाठी तातडीने आदेश द्यावेत, असे पत्र कारखान्यातर्फे साखर आयुक्तांना देण्यात आले.

--------------------------------------

*

ठळक नोंदी

* २०१३-२०१४ मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांच्या १५ सहकारी संचालकांनी कारखाना ‘ब्रिस्क’ला सहयोग तत्त्वावर चालवायला दिला होता; परंतु आज विरोधी बाकावर असतानाही ते कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिंदे-नलवडे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.

* माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

--------------------------------------

*

फोटो ओळी : हरळी (ता. गडहिंग्लज) येथे साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी ‘ब्रिस्क कंपनी’कडून गडहिंग्लज कारखान्याचा ताबा अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी संचालक व अधिकारी उपस्थित होते.

क्रमांक : ०९०४२०२१-गड-१३