Gadhinglaj Deputy Speaker Konkeri resigns | गडहिंग्लजच्या उपसभापती कोणकेरी यांचा राजीनामा

गडहिंग्लजच्या उपसभापती कोणकेरी यांचा राजीनामा

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या उपसभापती कोणकेरी यांचा राजीनामा हसुरी, नाईक यांच्यापैकी एकाला संधी

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापती श्रीया अनिकेत कोणकरी यांनी आघाडीने ठरवून दिलेला कार्यकाल संपल्याने आज (बुधवारी) सभापती रूपाली कांबळे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पंचायत समितीवर राष्ट्रवादी-काँगे्रस व स्थानिक ताराराणी आघाडी यांची संयुक्त आघाडी सत्तेत आहे. रिक्त झालेल्या उपसभापतीपदी स्वाभिमानीचे इराप्पा हसुरी किंवा काँगे्रसच्या इंदू नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्यात भाजपा आणि काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. परंतु, सभापती बदलण्यावरून बेबनाव निर्माण झाल्याची संधी साधून कॉंगे्रस-राष्ट्रवादीने भाजपाला सत्तेतून खाली खेचले. दुसऱ्या टप्यात ह्यताराराणीह्णच्या रूपाली कांबळे यांना सभापतीपद तर कोणकेरी यांना उपसभापतीपद देण्यात आले होते.

गेल्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात सोयीस्कर आघाड्या झाल्यामुळे बहुरंगी सामना झाला होता. सध्या सभागृहात भाजपाचे ३, कॉंगे्रस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आणि स्थानिक ताराराणी आघाडीचे ३ असे मिळून एकूण दहा सदस्य आहेत.

Web Title: Gadhinglaj Deputy Speaker Konkeri resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.