गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:30+5:302021-08-01T04:23:30+5:30

गडहिंग्लज : लायन्स क्लबतर्फे गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वाध्यायमाला व सेतू अभ्यासपुस्तिकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. देसाई ...

Gadhinglaj Brief News | गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज : लायन्स क्लबतर्फे गडहिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वाध्यायमाला व सेतू अभ्यासपुस्तिकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. देसाई होते.

याप्रसंगी प्राचार्य देसाई व ‘लायन्स’चे अध्यक्ष गौरव देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष श्रीप्रसाद सभासद, सचिव सूरज तोरगली, विनायक गळतगे, गुरुराज हत्ती, राजेंद्र वडगुले, रामगोंडा पाटील उपस्थित होते.

व्ही. आर. पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. पी. टी. पाटील यांनी आभार मानले.

- हसूरचंपूत आोद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण

गडहिंग्लज : हसूरचंपू येथील हिरण्यकेशी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. संस्थाध्यक्ष अण्णासाहेब गळतगे, उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, संचालक सुरेश कोळकी, श्रीकांत महाजन, सचिव रमेश लाटकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Gadhinglaj Brief News