शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथील होप फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे शकील जमादार, अंकुश ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथील होप फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे शकील जमादार, अंकुश दोडमणी, अमोल कांबळे, अरुण पाटील, आशपाक किल्लेदार, डॉ. स्वाती कमल, शिवाजी चौगुले आदी उपस्थित होते.

--- २) हसूरवाडीत लसीकरणासाठी विशेष मोहीम गडहिंग्लज : हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोना लसीकरणासाठी हसूरवाडीत आज (सोमवारी) विशेष मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती सरपंच संजय कांबळे यांनी दिली.

दिवसभरात हसूरसासगिरीचे ४६, हसूरवाडीचे २२१, कडाल ५, नौकूड २, हिडदुगी ६ असे एकूण २८० नागरिकांनी डोस घेतला. यासाठी डॉ. स्नेहा दाभाडे, तलाठी संतोष पाटील, ग्रामसेवक आनंद कोठावळे यांच्यासह कोरोना दक्षता समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

३) गिजवणेची केदारलिंग यात्रा रद्द

गडहिंग्लज : गिजवणे येथे मंगळवार (२७) व बुधवार (२८) रोजी ग्रामदैवत श्री केदारलिंग देवाची होणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. केवळ हक्कदार, मानकरी, पुजारी व डवरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी व पूजा-अर्चा होईल, अशी माहिती खातेदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

उत्तूर परिसरात पाऊस

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) परिसरात चारच्या सुमारास वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने ऊस पिकांना मिळाला. मासेवाडी, भादवण, हालेवाडी, वडकशिवाले, चिमणे, चव्हाणवाडी, उत्तूर, मुमेवाडी परिसरात पाऊस झाला. पावसामुळे शेतीकामांना वेग येणार आहे.

----------------------

-- ५) चव्हाणवाडी, होन्याळीत तहसीलदारांची भेट

उत्तूर : आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी, होन्याळी येथील कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी तहसीलदार विकास अहिर, वैद्यकीय अधिकारी समीर तौकरी यांनी गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत व कोरोना दक्षता कमिटीला गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.