गडहिंग्लज - संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:58+5:302021-03-24T04:22:58+5:30
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक यांच्यातर्फे शहीद दिनानिमित्त ...

गडहिंग्लज - संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक यांच्यातर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित शिबिरात ११० पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव अनिल कुराडे, दिग्विजय कुराडे, राहुल मगदूम, जयवंत पाटील, डॉ. सुभाष पाटील, आदी उपस्थित होते.
-- २) 'शिवराज'मध्ये शहीदांना अभिवादन
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. तेजस्विनी पाटील, सोनाली डंगी या विद्यार्थिनींनी भित्तिपत्रकातून क्रांतिकारकांच्या जीवनचरित्राची माहिती सादर केली. यावेळी विभागप्रमुख एन. आर. कोल्हापुरे, सुधीर मुंज, दीपक खेडकर, जी. जी. गायकवाड, अण्णासाहेब हरदारे, एन. आर. कोल्हापुरे, आदी उपस्थित होते.
- ३) गडकरी महाविद्यालयाचा निकाल जाहीर
गडहिंग्लज : येथील ई. बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचा बी.एच.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला. महाविद्यालयाची सोनाली बाळासाहेब पाटील हिने अंतिम वर्षात ६६.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला.
अंतिम वर्षात अनुक्रमे सोनाली पाटील (६६.८०), शैलजा सिताप (६२.८६), भक्ती पट्टणशेट्टी (६१.७३). द्वितीय वर्षात सफिया शेख (६९.४४), भाग्यश्री रानभारे (६९.२२), सिद्धी पोटफोडे (६५.७७), तृतीय वर्षात नेहा नाईक (६३.८३), सूरज कदम (६१.५०), सोनाली शिंगाडे (६०.६६) यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------
* सोनाली पाटील : २३०३२०२१-गड-०६