शोभादेवी शिंदे यांच्यावर नेसरीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:59+5:302021-05-12T04:24:59+5:30
कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका तथा नेसरी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती शोभादेवी शिंदे-नेसरीकर यांच्यावर ...

शोभादेवी शिंदे यांच्यावर नेसरीत अंत्यसंस्कार
कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका तथा नेसरी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती शोभादेवी शिंदे-नेसरीकर यांच्यावर मंगळवारी नेसरी येथे नातेवाईक व मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीमती शिंदे यांचे बंगलोर येथे सोमवारी (दि. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह ॲम्ब्युलसने नेसरी येथे आणण्यात आला. येथील घटप्रभा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र यशोधन यांनी विधीवत सोपस्कार पार पाडून भडाग्नी दिला. सोमवारी सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच नेसरीसह जिल्ह्यात शोककळा पसरली. श्रीमती शिंदे यांनी विविध पदे समर्थपणे सांभाळून आपला सामाजिक व राजकीय ठसा जिल्ह्यात उमटवला होता. नेसरी गावचे सुपुत्र व जिल्हा संघाचे संस्थापक दिवंगत बाबा नेसरीकर यांच्या स्नुषा, तर दिवंगत कॅप्टन दीपकराव शिंदे यांच्या त्या पत्नी होत. अंत्यसंस्कारप्रसंगी नेसरी व कोल्हापूर येथील शिंदे नेसरीकर परिवारासह अगदी निकटवर्तीय मंडळी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दिवसकार्य गुरुवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजता आहे.
उद्यासाठी जाहिरात आहेत.