शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार म्हणतात निधी दिला..पण कोल्हापूरला नाही मिळाला; निधीअभावी विकासकामे रखडली 

By भारत चव्हाण | Updated: November 7, 2025 16:52 IST

महापालिकेवर टीकेचे खापर

भारत चव्हाणकोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला. निधीचे आकडे कोटींच्या घरात आहेत. त्याचे फलकही शहरभर झळकले, परंतु मंजूर निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामे रखडली आहेत. निधी नसल्याने बरीच कामे बंद अथवा अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची अवस्था ‘आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे.कोल्हापुरात बुधवारी खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांची यादीच मांडली. ती ऐकल्यानंतर काहीसे संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही कोल्हापूरसाठी कोणत्या कामांसाठी किती कोटी रुपयांचा निधी दिला याची आकडेवारी धडाधड सांगून टाकली. त्यातील महापालिकेला प्रत्यक्षात किती रक्कम मिळाली याची गुरुवारी ‘लोकमत’ने खातरजमा केली.त्यामध्ये मंत्री पवार यांनी जाहीर केलेला निधी प्रत्यक्षात महापालिकेकडे आला नसल्याचे स्पष्ट झाले. निधी मंजूर आहे म्हटल्यावर आज उद्या येईल या आशेने निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर दिल्या. कामे सुरू झाली खरी, पण निधी नसल्याने कामे रेंगाळली. त्यामुळे निधी आणणारे आणि महापालिका प्रशासन पुरते बदनाम झाले आहे.

हा घ्या आरसा....सांडपाणी प्रकल्प : मंजूर २८७ कोटी, मिळाले ३.५० कोटीशहरातील पूर्वभागातील सांडपाणी, मैलामिश्रीत सांडपाणी याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारकडून अमृत योजनेतून २८७ कोटींचे पाच प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्या कामांची वर्कऑर्डर होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला, परंतु मंजूर निधीतील केवळ साडेतीन कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले.नगरोत्थानमधून रस्ते : मंजूर १०० कोटी ३३ लाख, मिळाले २३ कोटी ४१ लाखराज्यस्तर नगरोत्थान योजनेतून शहरातील सोळा रस्ते करण्याकरिता १०० कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर झाला. गेल्यावर्षी कामाला सुरुवात झाली. मंजूर निधीतील २३ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ठेकेदाराची बिले देऊन पुढील काम सुरू होण्याकरिता ४६ कोटी ८२ लाखांच्या निधीसाठी पालिका प्रशासनाने दोनवेळा राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला. परंतु त्याला उत्तरही नाही आणि निधी सोडण्यास आलेला नाही. त्यामुळे ही कामे संथ गतीने सुरू आहेत.४५ कोटी कुठे आहेत..?शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या सत्यजित कदम यांनी मूूलभूत सेवा-सुविधा योजनेतून राज्य सरकारकडून २५ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्ते आणि गटारीच्या कामांचा समावेश आहे. आणखी एकदा मूलभूत सेवा-सुविधा योजनेतून २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, तोही निधी आला नाही. त्यामुळे या ४५ कोटीमध्ये धरण्यात आलेल्या कामांचे अजून नारळही फुटलेले नाहीत.केएमटी चार्जिंग सेंटर : मंजूर १७ कोटी १८ लाख, मिळाले ४ कोटी ३० लाखकेएमटीकडे लवकरच ई बसेस येणार आहेत. त्यांच्या चॅर्जिंग स्टेशन व डेपो अद्ययावतीकरणाकरिता १७ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामेही सुरू आहेत. मंजूर निधीतील ४ कोटी ३० लाखांचाच निधी प्राप्त झाला आहे.‘केशवराव भोसले उभारणी : मंजूर २५ कोटी, मिळाले १२ कोटी ५० लाखकेशवराव भोसले नाट्यगृहाला २५ कोटी १० लाख मंजूर झाले, त्यापैकी १२ कोटी ५० लाखांचा निधी आला आहे. उर्वरित निधीदेखील लवकर उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.दोन वर्षे वित्त आयोगाची दमडी नाही..पंधराव्या वित्त आयोगातून महानगरपालिकेला प्रत्येक वर्षी १८ ते २० कोटींचा निधी दिला जातो. अडीच वर्षांपूर्वी एकदा निधी आला, त्यानंतर मागच्या दोन वर्षांत एक रुपयाही आलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar says funds allocated, but Kolhapur hasn't received them.

Web Summary : Kolhapur's development projects are stalled due to lack of funds, despite government approvals. Ajit Pawar claims funds were allocated, but the municipality reports significant shortfalls, hindering crucial infrastructure projects and leaving contractors unpaid.