गावतलावाच्या संवर्धनासाठीही आता निधी

By Admin | Updated: March 9, 2017 00:08 IST2017-03-09T00:08:42+5:302017-03-09T00:08:42+5:30

‘लोकमत’ने मांडला होता विषय : पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे जतन होणार

Funds for the conservation of Gavatla | गावतलावाच्या संवर्धनासाठीही आता निधी

गावतलावाच्या संवर्धनासाठीही आता निधी

समीर देशपांडे --कोल्हापूर---गावागावांतील तलावांच्या संवर्धनासाठी आता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या जनसुविधा योजनेतून निधी उपलब्ध होणार आहे. दारात नळाचे पाणी आल्यापासून गावतलावांकडे ग्रामस्थांचे आणि शासनाचेही दुर्लक्ष होत आहे आणि त्यासाठीही निधीही उपलब्ध होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१६ च्या अंकामध्ये मांडले होते. जनसुविधा योजना ही २०१० पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेतून ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी आणि स्मशानभूमीतील सुधारणांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. या दोनच बाबींवर खर्च करावयाचा असल्याने एकीकडे ही दोन कामे वेगाने होत असताना अन्य बाबींवर खर्च करण्यावर नियमांमुळे मर्यादा येत होत्या. आता ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी सुधारणा याबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे, अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसविणे, जलशुद्धिकरण आर. ओ. प्लँटची व्यवस्था करणे, गावतलावातील गाळ काढून गावतलावाचे सुशोभीकरण करणे, घनकचरा व्यवस्था करणे व भूमिगत गटारे बांधणे या कामांचाही समावेश करण्यात येणार आहे. शासनाने या कामांचा समावेश करून पाणी सुविधांना प्राधान्य दिले असून, घनकचरा आणि सांडपाणी निर्गतीलाही महत्त्व दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रतिवर्षी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी या योजनेतून उपलब्ध होतो. त्यातून अनेक ग्रामपंचायतींची कार्यालये बांधण्यात आली असून, गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील बहुतांशी स्मशानभूमींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच स्मशानशेड उभारणी आणि स्मशानभूमीतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे. आतातर या कामांचाही समावेश करण्यात आल्याने गावागावांत आणखी वैविध्यपूर्ण कामे करणे शक्य होणार आहे.

गावोगावी तलावांना चांगले दिवस
थेट नळाद्वारे पाणी मिळू लागल्याने ग्रामपंचायतींपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांनीच गावतळी दुर्लक्षित केली. त्यामध्ये गाळ साचू लागला. पाण्याचा वापर थांबला, तळी मुजू लागली; परंतु गावाजवळच असलेल्या या नैसर्गिक पाणीसाठ्यांचे जतन होण्याची गरज ‘लोकमत’ने मांडली होती. शासनाने त्यासाठी निधी लावण्याचीही गरज मांडली होती. आता ही कामे घेता येणार असल्याने गावोगावच्या तलावांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

तालुकावार गावतलाव व विहिरी
तालुक्याचे गावतलावसार्वजनिक वापरातील
नाव विहिरीविहिरी
आजरा३२८९७३
भुदरगड२0३७३७
चंदगड८५१३३१११
गगनबावडा0९१६१६
गडहिंग्लज४११0३५९
हातकणंगले३५८४७२
करवीर६९१0८९0
कागल३७८३६१
पन्हाळा४४१६३१२१
राधानगरी१९७३४४
शाहूवाडी३८८४६९
शिरोळ२१ १३१२
एकूण४५३९८६७६५



ग्रामपंचायतींना सुधारित शवदाहिनींचा पुरवठा
वर्षमंजूर निधीपुरविलेल्या
शवदाहिनींची संख्या
२०१०/११६६ लाख१२५
२०१२/१३१ कोटी २९ लाख२५०
२०१४/१५१ कोटी१७९
२०१६/१७५० लाख८८ नग (प्रस्तावित)

स्मशान शेड बांधणे
वर्षस्मशान शेड बांधणे/
सुधारणा करणे मंजूर कामे
२०१२/१३२२५
२०१३/१४२०६
२०१४/१५१८६
२०१५/१६२२७
२०१६/१७१०५

Web Title: Funds for the conservation of Gavatla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.