कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:26 PM2020-09-03T16:26:30+5:302020-09-03T16:31:37+5:30

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे, पण कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

Funding for Kolhapur will not be reduced: Chief Minister, carry out the Chase the Virus campaign on a war footing | कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा

कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा

Next
ठळक मुद्देकोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्रीचेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे, पण कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उध्दव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होवू देवू नका. इतर देश फक्त कोव्हिड एके कोव्हिडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे.

सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूरक राबवा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देवून कुटूंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश्य काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत.

मास्क व इतर शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेह-याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येणार आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपापल्या जिल्ह्यांचा यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा दिला. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही आढावा दिला.

मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विगागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मेहता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधीकारी अमन मित्तल, अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक बी सी केम्पीपाटील, प्र. आरोग्य उपसंचालक ज्ज्वला माने आदी उपस्थित होते.

Web Title: Funding for Kolhapur will not be reduced: Chief Minister, carry out the Chase the Virus campaign on a war footing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.