तसेच पन्हाळा शाहुवाडी मतदार संघातील गाववाडी वस्तीवरील रस्त्यासाठी २ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये नांदगाव सोनुर्ले पाटीलवाडी रस्त्यासाठी ४९ लाख,गाडेवाडी-शिरगाव रस्त्यासाठी ५५.७० लाख, शेंबवणे रस्त्यासाठी ५२.८८ लाख, शाहुवाडी-ओकोली-शिराळे रस्त्यासाठी ६४.७६ लाख,सोनवडे- परखंदळे रस्त्यासाठी ३० लाख, करंजफेण-बादिवडे रस्त्यासाठी २५ लाख निधी मंजूर करण्यात असल्याचे सांगण्यात आले. संबंधित रस्ते अनेक दिवसांपासून खराब झाले होते. यातून लोक जीवघेणा प्रवास करत होते. रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाल्यामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बाजार समिती माजी सभापती परशुराम खुडे,रणजितसिंह शिंदे,पन्हाळा पंचायत समिती उपसभापती रश्मी कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील,पंचायत समिती माजी सभापती अनिल कंदुरकर,पृथ्वीराज सरनोबत,संजय माने,युवराज गायकवाड,दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
कोतोली फाटा ते नांदारी रस्त्यासाठी २०६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST